मला सांगितले तर राजकारणात येईन - साध्वी प्रज्ञासिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 03:06 AM2018-02-19T03:06:03+5:302018-02-19T03:15:07+5:30

मला राजकारणात येण्यास सांगितले तर मी येईल. विद्यार्थीदशेपासून राजकारणात होते. मी अनेक नेते देशासाठी, समाजासाठी घडविले.

If I told, I would go to politics - Sadhvi Pragya Singh | मला सांगितले तर राजकारणात येईन - साध्वी प्रज्ञासिंह

मला सांगितले तर राजकारणात येईन - साध्वी प्रज्ञासिंह

googlenewsNext

औरंगाबाद : मला राजकारणात येण्यास सांगितले तर मी येईल. विद्यार्थीदशेपासून राजकारणात होते. मी अनेक नेते देशासाठी, समाजासाठी घडविले. देशासाठी जे आवश्यक असेल ते कार्य मी करेन, असे सांगत साध्वी प्रज्ञासिंह यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिले.
हो भगवा दहशतवाद आहे; पण तो अधर्मीयांसाठी आहे. भगव्या रंगाला दहशतवादी समजणे ही मानसिकता आहे. माझ्याकडे काहीही दुर्लक्ष झालेले नाही. देशात ‘अच्छे दिन’ आहेत काय? राष्ट्र सेवा हेच ‘अच्छे दिन’ असल्याचे नमूद करीत राममंदिर तेथेच बांधले जाईल, असा दृढविश्वास त्यांनी व्यक्त केला.
मला ‘मॅडम’ म्हणू नका, देशात बाहेरून आलेल्या एकच मॅडम असल्याचे नमूद करीत काँग्रेसच्या षड्यंत्रामुळे तुरुंगवास भोगल्याचा आरोप त्यांनी केला. मला तुरुंगात खूप ‘टॉर्चर’ केले गेले. त्यामुळे हाडांचा आजार झाला आहे. मणक्यांच्या उपचारासाठी बंगळुरूला जावे लागते. कॅन्सर व अन्य एका आजाराचे आॅपरेशन अलीकडच्या काळात झाले आहे. गळ्यालादेखील वारंवार इन्फेक्शन होत आहे. तुरुंगात झालेल्या त्रासावर पुस्तक लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: If I told, I would go to politics - Sadhvi Pragya Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.