औरंगाबादमध्ये विमाननिर्मिती उद्योगाचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 01:07 AM2018-04-22T01:07:14+5:302018-04-22T01:07:24+5:30

येणाऱ्या काळात महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या आणखी पुढारलेले असेल.

The idea of ​​aeronautical industry in Aurangabad | औरंगाबादमध्ये विमाननिर्मिती उद्योगाचा विचार

औरंगाबादमध्ये विमाननिर्मिती उद्योगाचा विचार

googlenewsNext

औरंगाबाद : पुढच्या काही वर्षांत एक हजार नवीन विमाने विकत घ्यावी लागणार आहेत. त्यासाठी कार्गाे पॉलिसी तयार केली जात
आहेत. पुढच्या काही वर्षांत १० लाख कोटींची विमान खरेदी करावी लागतील. त्या सर्व विमानांचे भारतात उत्पादन व्हावे. त्यासाठी नियम बनविले जात आहेत. आॅरिक सिटीतील शेंद्रा-बिडकीनमध्ये मुबलक प्रमाणात जागा असल्यामुळे येथे विमाननिर्मिती उद्योग सुरू करण्याची शक्यता केंद्रीय उद्योग तथा नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू शनिवारी वर्तविली.
बिडकीन येथील आॅरिक टप्पा-२ च्या भूमिपूजनप्रसंगी ते म्हणाले, पुढच्या काही वर्षांत आॅरिक औद्योगिक वसाहतीमधील जागेचा विमाननिर्मिती उद्योगासाठी विचार होऊ शकतो. विमान उद्योग येथे आल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. ड्रोन उत्पादन उद्योगाची १ मिलियन डॉलरची उलाढाल आहे. त्यामुळे ड्रोनचे उत्पादनदेखील विमान उत्पादनासोबत करण्याचा विचार होईल. साधारणत: दीड लाख लोकांना आॅरिकमध्ये रोजगार मिळेल. विमानाचे, ड्रोन उत्पादन येथे सुरू झाले तर रोजगार निर्मितीचा आकडा खूप मोठा असेल, त्या उद्योगांशी निगडित लघुउद्योगदेखील येथे येतील, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र आघाडीवर : जगातील अनेक उद्योगांना येथे गुंतवणूक करायची आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या आणखी पुढारलेले असेल. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसह ९० हजार कोटींचा ग्रेट कॉरिडॉर निर्माण करण्याचे ठरविले आहे. डिसेंबरपर्यंत तो प्रकल्प पूर्ण होईल. कच्चा माल येण्यासाठी रेल्वेचे जाळे निर्माण केल्या आहेत. डीएमआयसी हा प्रकल्प केंद्र व राज्य सरकारचे संबंध कसे असावे, त्याचा आदर्श आहे. डीएमआयसी, अमृतसर ते कोलकाता, चेन्नई ते बंगळुरू, बंगळुरू ते मुंबई हे प्रकल्प आल्यावर विकासाला चालना मिळेल. पर्यावरणाची काळजी या प्रकल्पात घेतली जाईल.

रोजगार निर्मितीच्या आकड्यात तफावत
मुख्यमंत्र्यांनी डीएमआयसीमध्ये ३ लाख रोजगार निर्मितीची क्षमता असल्याचा दावा केला, तर केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी दीड लाख उद्योग निर्मिती होईल, असे सांगितले. दोन्हींच्या आकड्यांतील तफावत चर्चेचा विषय ठरली.

Web Title: The idea of ​​aeronautical industry in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.