आकर्षक व्याजाचे आमिष देऊन लाखोंची फसवणूक करणारा अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 03:46 PM2018-11-23T15:46:28+5:302018-11-23T15:48:32+5:30

 आकर्षक व्याज देण्याचे आमिष देऊन आठजणांची ७२ लाखाची फसवणूक करणाऱ्या आरोपीस अटक करण्यास पोलिसांना यश आले.

Hundreds of millions of fraud cheated by attractive lending interest | आकर्षक व्याजाचे आमिष देऊन लाखोंची फसवणूक करणारा अटकेत 

आकर्षक व्याजाचे आमिष देऊन लाखोंची फसवणूक करणारा अटकेत 

googlenewsNext

औरंगाबाद :  आकर्षक व्याज देण्याचे आमिष देऊन आठजणांची ७२ लाखाची फसवणूक करणाऱ्या आरोपीस अटक करण्यास पोलिसांना यश आले. चेतन भोपलवाद असे या आरोपीचे नाव असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.  

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन भोपलवाद याने  गॅलेंट फायनान्शियल सर्विसेस अशी एक बोगस कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून तो एक लाखाच्या गुंतवणूकीवर दरमहा सहा हजार रुपये परतावा देण्याचे अमिष देत असे. या आमिषाला बळी पाडत चेतनने आठ जणाना ७२ लाखाचा गंडा घातला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी चेतनला अटक असून त्याची चौकशी सुरु आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले, उपनिरीक्षक अजय सूर्यवंशी आणि कर्मचारी यानी केली.  

Web Title: Hundreds of millions of fraud cheated by attractive lending interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.