उपायुक्तांच्या घरात सापडले दिड किलो सोनं, दोन किलो चांदी अन ४ लाखाची रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 05:09 PM2017-10-27T17:09:17+5:302017-10-27T17:12:45+5:30

कारवाईत पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी उपायुक्त अय्युब खान याच्या टाकळकर हौसिंग सोसायटीच्या मागील मदनी कॉलनीतील  बंगल्याची झडती घेतली.

Hundreds of gold, two kg of silver and 4 lacs of cash found in the house of the accused | उपायुक्तांच्या घरात सापडले दिड किलो सोनं, दोन किलो चांदी अन ४ लाखाची रोकड

उपायुक्तांच्या घरात सापडले दिड किलो सोनं, दोन किलो चांदी अन ४ लाखाची रोकड

googlenewsNext
ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी उपायुक्त अय्युब खान याच्या टाकळकर हौसिंग सोसायटीच्या मागील मदनी कॉलनीतील  बंगल्याची झडती घेतली. रात्रभर चाललेल्या या घरझडती मोठ्या प्रमाणात सोने, चांदी व रोकड सापडली  

औरंगाबाद: लिपीकामार्फत एक लाखाची लाच घेतल्याप्रकरणी पकडण्यात आलेला महानगर पालिकेचा उपायुक्त अय्युब खान नुरखान पठाण याच्या घरात दिड किलो सोन्याचे दागिने, दोन किलो चांदी, ४ लाख १९ हजार ६५०रुपयांची सोन्याची रोकड अन विविध बँक खात्यांची पासबूक आणि अन्य महत्वाची कागदपत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले. 

याविषयी अधिक माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक किशोर चौधरी यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रोजंदारीवरील कनिष्ठ लिपीकास सेवेत कायम करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी मनपातील अस्थापना विभागाचा उपायुक्त(महसूल) अय्युब खान याने तीन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. या लाचेचा पहिला हप्ता म्हणून वरिष्ठ लिपीक दादाराव लाहोटी याच्यामार्फत २६ आॅक्टोबर रोजी १ लाख रुपये सायंकाळी स्विकारले. याप्रकरणी आरोपीविरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

रात्रभर चालली झडती 
या कारवाईत पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी उपायुक्त अय्युब खान याच्या टाकळकर हौसिंग सोसायटीच्या मागील मदनी कॉलनीतील  बंगल्याची झडती घेतली. रात्रभर चाललेल्या या झडतीत घरात दिड किलो सोन्याचे दागिने, दोन किलो चांदी, ४ लाख १९ हजार ६५०रुपयांची सोन्याची रोकड अन विविध बँक खात्यांची पासबूक आणि अन्य महत्वाची कागदपत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले.

Web Title: Hundreds of gold, two kg of silver and 4 lacs of cash found in the house of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.