अहो, आश्चर्य घडले... कचराकोंडीत किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 01:05 AM2018-06-24T01:05:46+5:302018-06-24T01:06:48+5:30

औरंगाबाद शहर मागील चार महिन्यांपासून कचराकोंडीच्या विळख्यात सापडले आहे. जागोजागी साचलेल्या कचऱ्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

Hey, it's a surprise ... garbage in the garbage | अहो, आश्चर्य घडले... कचराकोंडीत किमया

अहो, आश्चर्य घडले... कचराकोंडीत किमया

googlenewsNext
ठळक मुद्देगतवर्षीच्या २९९ वरून औरंगाबाद १२८ व्या स्थानी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबाद शहर मागील चार महिन्यांपासून कचराकोंडीच्या विळख्यात सापडले आहे. जागोजागी साचलेल्या कचऱ्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीतही शहराची स्वच्छतेसंदर्भात कामगिरी सुधारण्याची किमया झाली आहे. देशपातळीवरील स्वच्छतेच्या सर्वेक्षणात शहराने १२८ वा क्रमांक प्राप्त केला आहे. विशेषत: कचराकोंडी नसताना म्हणजे गतवर्षी शहराचा २९९ वा क्रमांक होता.
कें द्र सरकारने २०१४ या वर्षापासून ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले आहे. यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेची स्पर्धा घेण्यात येत आहे. यावर्षी या सर्वेक्षणात देशभरातील ४ हजार ४१ शहरांनी सहभाग घेतला होता. मागील औरंगाबाद शहराचा या सर्वेक्षणात देशात २९९ वा क्रमांक आला होता. यावर्षी तरी किमान स्वच्छतेत सुधारणा व्हावी म्हणून औरंगाबाद महानगरपालिका प्रशासन आठ महिन्यांपासून प्रयत्नशील होते; परंतु हे प्रयत्न सुरू असतानाच १६ फेब्रुवारीपासून नारेगाव येथील कचरा डेपो कायमचा बंद पडला आणि शहरात कचराकोंडी निर्माण झाली. शहरात मनपाला कचरा टाकण्यासाठी व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागा आणि मशिनरी मिळालेली नाही. त्यामुळे शहरात फेब्रुवारी महिन्यापासून रस्तोरस्ती आणि गल्लोगल्ली कचºयाचे ढीग साचलेले आहेत. या सगळ्या प्रकाराने नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.
शहराला २,४६४ गुण
यावर्षी स्वच्छता सर्वेक्षण हे एकूण ४ हजार गुणांचे होते. यापैकी औरंगाबाद शहराला एकूण २,४६४ गुण मिळाले आहेत.
४ हजार गुणांमध्ये कागदोपत्री अहवालासाठी १,४०० गुण, प्रत्यक्ष पाहणीसाठी १,२०० आणि सिटीजन्स फिडबॅकसाठी १,४०० गुण होते.
यामध्ये औरंगाबाद शहराला प्रत्यक्ष पाहणीत सर्वाधिक ९६९ गुण मिळाले आहेत. कागदोपत्री अहवालाला ५६२, तर सिटीजन्स फिडबॅकला ९३३ गुण मिळाले आहेत.

Web Title: Hey, it's a surprise ... garbage in the garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.