औरंगाबाद : प्राप्तिकर आॅडिट रिपोर्ट दाखल करणे व रिटर्न भरण्यासाठी मंगळवारी अखेरचा दिवस होता. पण प्राप्तिकर विभागाची वेबसाइट दुपारनंतर हँग झाली. यामुळे सीए, करसल्लागारांचा ताण वाढला होता. रात्री उशिरापर्यंत कार्यालयात सीए व त्यांचे कर्मचारी बसून होते. सोमवारी ३० आॅक्टोबर रोजी जुलै २०१७ ची जीएसटीआर-२ आणि जीएसटीआर-३ ही विवरणपत्रे भरण्यास अनुक्रमे ३० नोव्हेंबर आणि ११ डिसेंबर २०१७ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. यामुळे व्यापारी, उद्योजक, सीए, करसल्लागारांना थोडासा दिलासा मिळाला होता. पण तो फार वेळ टिकू शकला नाही. कारण आर्थिक वर्ष २०१६-२०१७ चे प्राप्तिकर आॅडिट रिपोर्टर दाखल करणे व रिटर्न भरण्याची 31 आॅक्टोबर शेवटची तारीख होती. यामुळे सीए, करसल्लागारामध्ये लगीनघाई सुरू होती.

एक आॅडिट रिपोर्ट दाखल करणे व रिटर्न इन्कम ट्रॅक्स ई-फायलिंग डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाइटवर आॅनलाइन भरण्यास कमीत कमी अर्धा तास लागत होता. एवढ्या धीम्यागतीने नेटवर्क सुरू होते. दुपारी २ वाजेपासून वेबसाइटवर करदात्यांचा आरएसए टोकन नंबर विचारल्या जाऊ लागला. यामुळे माहिती भरण्यास आणखी उशीर होऊ लागला. यात कहर म्हणजे ४.३० वाजेपासून तर वेबसाईट हँग झाली. यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. तासन्तास बसूनही एकही आॅडिट रिपोर्ट, रिटर्न दाखल होत नसल्याने सीए, करसल्लागार, अकाऊंटंट यांच्यावर मोठा ताण वाढला होता. सीए आॅफीसमध्ये करदात्यांचे सतत फोन खणखणत होते. यासंदर्भात सीए उमेश शर्मा यांनी सांगितले की, ज्यांची वार्षिक उलाढाल २ कोटीपेक्षा अधिक आहे.त्यांचा टॅक्स आॅडीट रिपोर्ट व रिर्टन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. सोमवारी आम्ही दिवसभरात २६ फाईल अपलोड केल्या होत्या. मात्र, आज ६ फाईलच अपलोड करु शकलो. फाईल अपलोड करण्याचे बटण दाबले की, आपण ह्यडिजीटल क्यूह्ण अर्थात डिजीटल रांग आहात. असा संदेश मिळत होता. कारण, देशभरात एकाच वेळी लाखो फाईल अपलोड करण्यात येत असल्याने वेबसाईटवरील ताण प्रचंड वाढला व अखेर ती हँग झाली. जीएसटी प्रमाणे आयकर विभागही आॅडीट रिपोर्ट व रिर्टन भरण्याची तारीख वाढवून देते का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
जीएसटीला पहिले प्राधान्य
जीएसटीआर-२ व जीएसटीआर-३ ही रिर्टन दाखल करण्यास पहिले प्राधान्य देण्यात आले. दिवाळीमध्ये व्यापारी, उद्योजक मग्न असल्याने त्यांनी लक्ष दिले नाही. दिवाळीनंतर जीएसटी व आयकरची टिर्टन दा्नखल करण्याचा ओघ वाढला. सीएचे आॅफीसमध्ये रात्री २ ते ३ वाजेपर्यंत आॅनलाईन रिर्टन दाखल करण्याचे काम सुरु होते. मात्र, जीएसटीआर-२ मध्ये खरेदीबीलाची तपासणी करण्यात अनंत अडचणी आल्या. कारण, प्रत्येक बीलाची तपासणी करण्यात येत होती.आॅफलाईन युटीलिटीत डेटा सेव्हींगचे अप्लीकेशन नसल्याने थोडीही नजर अंदाज झाला तर पुन्हा पहिल्यापासून बील तपासावे लागत होते. त्यात नेटवर्क धीम्यागतीने चालत असल्याने अडचणीत आणखी वाढ झाली. जीएसटीमुळे आयकर आॅडीट रिपोर्ट दाखल करण्यास वेळ लागला. यामुळे अखेरीस एकच गोंधळ माजला.
सर्वांचे लक्ष तारीख वाढवून देण्याचा बातमीकडे
सीए संघटनेचे अध्यक्ष अल्केश रावका यांनी सांगितले की, आयकर आॅडीट रिपोर्ट व रिर्टन दाखल करण्याची ३१ रोजी शेवटची तारीख होती पण आयकर विभागाची वेबसाईट हँग झाल्याने देशभर गोंधळ उडाला. या तांत्रिक अडचण लक्षात घेता केंद्र सरकार आयकर आॅडीट रिपोर्ट व रिर्टन दाखल करण्याची तारीख वाढवून देते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आम्ही सीए संघटनेच्या मुंबईतील मुख्यालयात सतत संपर्क साधून होतो.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.