गुजरातच्या 'एमआर' चा औरंगाबादमध्ये मृत्यू; बसस्थानकाजवळ लॉजमध्ये आढळला कुजलेला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 01:14 PM2017-12-27T13:14:17+5:302017-12-27T13:16:24+5:30

औषधी कंपनीत एम. आर. म्हणून काम करणा-या  गुजरातच्या एका एकोणचाळीस वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी रात्री कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका लॉजमध्ये तो काही दिवसापासून मुक्कामी होता.

Gujarat's MR dies in Aurangabad; The dead bodies found in the lodge near the bus stand | गुजरातच्या 'एमआर' चा औरंगाबादमध्ये मृत्यू; बसस्थानकाजवळ लॉजमध्ये आढळला कुजलेला मृतदेह

गुजरातच्या 'एमआर' चा औरंगाबादमध्ये मृत्यू; बसस्थानकाजवळ लॉजमध्ये आढळला कुजलेला मृतदेह

googlenewsNext
ठळक मुद्देराकेशेभाई हसमुखभाई पटेल (३९ ) (रा. नारोडा, अहमदाबाद, गुजरात) असे मृताचे नाव आहे. ते औषधी कंपनीमध्ये एमआर म्हणून कार्यरत होते. कंपनीच्या कामानिमित्त नेहमीच त्यांचे शहरात येणे जाणे होते.

औरंगाबाद : औषधी कंपनीत एम. आर. म्हणून काम करणा-या  गुजरातच्या एका एकोणचाळीस वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी रात्री कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका लॉजमध्ये तो काही दिवसापासून मुक्कामी होता.

राकेशेभाई हसमुखभाई पटेल (३९ ) (रा. नारोडा, अहमदाबाद, गुजरात) असे मृताचे नाव आहे. क्रांतिचौक पोलिसांनी सांगितलें की, पटेल हे मूळचे गुजरातचे रहिवाशी आहेत. ते औषधी कंपनीमध्ये एमआर म्हणून कार्यरत होते. कंपनीच्या कामानिमित्त नेहमीच त्यांचे शहरात येणे जाणे होते.

22 डिसेंबर रोजी ते नित्यप्रमाणे कंपनीच्या कामानिमित्त शहरात आले होते. तेंव्हापासून ते बसस्थानक परिसरातील शिवशक्ती लॉजमध्ये थांबले होते.2 दिवस झाले तरी पटेल रूमबाहेर न आल्याने लॉज चालकाला संशय आला व त्यांनी पटेल यांच्या रूमचा दरवाजा ठोठावला परंतु आतून  प्रतिसाद मिळत नव्हता. शिवाय आतून तीव्र दुर्गंधी येत असल्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आले. दार उघडून पाहिले असता  पटेल हे मृत अवस्थेत आढळले. पोलिसांनी  घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात उत्तरिय तपासणी साठी पाठवला आहे. मृत्यूचे कारण त्यानंतरच स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: Gujarat's MR dies in Aurangabad; The dead bodies found in the lodge near the bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.