अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची गुजरातमूधन केली सुटका, गुन्हे शाखा आणि मुकुंदवाडी पोलिसांची संयुक्त कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:41 PM2017-10-26T12:41:23+5:302017-10-26T12:43:43+5:30

२१ सप्टेंबर रोजी मुकुंदवाडी परिसरातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची गुजरातमधील सुरत येथून सुटका करण्यात गुन्हे शाखा आणि मुकुंदवाडी पोलिसांच्या संयुक्त पथकाला मंगळवारी यश आले.

Gujarat's kidnapped minors rescued from Gujarat, crime branch and Mukundwadi police joint action | अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची गुजरातमूधन केली सुटका, गुन्हे शाखा आणि मुकुंदवाडी पोलिसांची संयुक्त कारवाई

अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची गुजरातमूधन केली सुटका, गुन्हे शाखा आणि मुकुंदवाडी पोलिसांची संयुक्त कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देसत्यपाल वाकोडे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्यास २७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.आरोपी आणि पीडिता राहत असलेल्या सुरत येथील अमरोली भागातील घरावर छापा मारून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना औरंगाबादेत आणले.

औरंगाबाद : २१ सप्टेंबर रोजी मुकुंदवाडी परिसरातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची गुजरातमधील सुरत येथून सुटका करण्यात गुन्हे शाखा आणि मुकुंदवाडी पोलिसांच्या संयुक्त पथकाला मंगळवारी यश आले. पीडितेला पळवून नेल्यानंतर तिच्यावर अत्याचार करणा-या तरुणाला पोलिसांनी अटक केली. 

सत्यपाल वाकोडे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्यास २७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. याविषयी अधिक माहिती देताना गुन्हे शाखा पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन तरुणी २१ सप्टेंबर रोजी कॉलेजला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. आरोपी वाकोडे आणि तिची मैत्री आहे. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. ही घटना समजल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. 

पीडितेचा शोध घ्यावा यासाठी तक्रारदारांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची भेटही घेतली होती. आयुक्तांनी त्यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत सायबर क्राइम, गुन्हे शाखा आणि मुकुंदवाडी पोलिसांना याप्रकरणी तातडीने तपास करण्याचे आदेश दिले, तेव्हापासून पोलीस संशयित आरोपी वाकोडेचा पत्ता शोधत होते. पळून गेल्यापासून तो नातेवाईक आणि मित्रांशीही संपर्क साधत नव्हता. यामुळे पोलिसांची अडचण होत होती. असे असताना पोलिसांनी त्याला शोधून काढले. तो आणि पीडिता राहत असलेल्या सुरत येथील अमरोली भागातील घरावर छापा मारून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना औरंगाबादेत आणले.

पीडितेने दिलेल्या जबाबानुसार आरोपीने तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराची कलमे नोंदविली. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, निरीक्षक शिवाजी कांबळे, प्रेमसागर चंद्रमोरे, सहायक निरीक्षक जी.एस.चव्हाण, उपनिरीक्षक हेंमत तोडकर, अनिल वाघ, पोहेकॉ धुडकू खरे, भावसिंग चव्हाण, हकीम पटेल, सायबर क्राइम सेलचे नितीन देशमुख, विवेक औटी, प्रदीप कुटे यांनी केली.

Web Title: Gujarat's kidnapped minors rescued from Gujarat, crime branch and Mukundwadi police joint action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kidnappingअपहरण