सेनगाव बाजार समितीची सूत्रे प्रशासकाच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 06:41 PM2018-09-15T18:41:16+5:302018-09-15T18:49:09+5:30

बाजार समितीच्या कारभाराचे अखेर  प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक अधिकाऱ्यांने सूत्रे स्वीकारले.

The governor's control on Sengupa Market Committee | सेनगाव बाजार समितीची सूत्रे प्रशासकाच्या हाती

सेनगाव बाजार समितीची सूत्रे प्रशासकाच्या हाती

googlenewsNext

सेनगाव (हिंगोली) : संचालक मंडळ बरखास्त झालेल्या सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराचे अखेर  प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक अधिकाऱ्यांने सूत्रे स्वीकारले. यामुळे निवडणुकीचा माध्यमातून आलेल्या संचालक मंडळाच्या कारभाराचा अध्याय अखेर संपुष्टात आला आहे.

तडजोडीचा व सत्ता संघर्षाचा  राजकारणा तालुक्यात  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेवट झाला. गटातडाचे राजकारण व सत्तेची लालसा या मुळे सत्ताधारी गटाचे संचालकच एकमेका विरोधात शड्डू ठोकून उभे राहिल्याने तिन वर्षांत निवडणुकीचा माध्यमातून अस्तित्वात आलेल्या संचालक मंडळाचा शेवट अविश्वास ठराव,९ संचालकाचे राजीनामे शेवट बाजार समिती बरखास्तीने झाला आहे. 

राज्य शासनाने बाजार समिती मध्ये केवळ सातच संचालक राहिल्याने प्रशासकीय दृष्टीने अडचण निर्माण होवू शकते यामुळे निवडणूक घेण्याचा सुचना देत बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त केले. काही दिवस, महिन्यानी पून्हा निवडणूक होईल .परंतु तडजोडीचे राजकारण करणाऱ्या तालुक्यातील राजकीय मंडळींसमोर पुन्हा अशीच परिस्थिती उदभवली तर काय करायच असा प्रश्न आहे. त्याचा विचार सर्वांनीच करण्याची गरज आहे. 

राजकीय प्रगल्भतेचा अभाव व सत्तेचा संघर्षात बाजार समिती वरील लोकनियुक्त संचालक मंडळ वेगवेगळ्या कारणांमुळे तीन वर्षच कारभार पाहू शकले. सहकाराचा राजकरणात आर्थिक सुबत्ता आणणाऱ्या बाजार समितीची सत्ताधारी व विरोधकांच्या राजकारणात चागलीच फरफटक झाली असून त्याचा परिणाम बाजार समिती विकासावर झाला आहे.संचालक मंडळ बरखास्त झाल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सूत्रे सहाय्यक निबंधक अधिकारी एम.ऐ.भोसले यांनी स्वीकारले आहेत. आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या बाजार समिती वर प्रशासनाने पदभार स्विकारला असल्याने किमान चागले दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
 

Web Title: The governor's control on Sengupa Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.