सरकार खरंच विचित्र निर्णय घेतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:48 PM2017-08-16T23:48:38+5:302017-08-16T23:48:38+5:30

सध्याचे सरकार खरोखरच विचित्र निर्णय घेत असल्याने शेतकºयांना तर अनेक अडचणीला तोंड द्यावेच लागते. त्यामुळे आता शेती अस्तीत्वाचीही भीती निर्माण झाल्याने तेवढीतरी वाचविण्यासाठी शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती ‘शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाचे’ राज्य निमंत्रक शंकर अण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली

The government really makes odd decisions | सरकार खरंच विचित्र निर्णय घेतेय

सरकार खरंच विचित्र निर्णय घेतेय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सध्याचे सरकार खरोखरच विचित्र निर्णय घेत असल्याने शेतकºयांना तर अनेक अडचणीला तोंड द्यावेच लागते. त्यामुळे आता शेती अस्तीत्वाचीही भीती निर्माण झाल्याने तेवढीतरी वाचविण्यासाठी शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती ‘शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाचे’ राज्य निमंत्रक शंकर अण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हिंगोलीतील शासकीय विश्राम गृह येथे १६ आॅगस्ट रोजी किसान मंत्र कार्यकारी समितीची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी कार्यकारी समिती सदस्य दत्ता पवार, आ. रामराव वडकुते, रा. कॉ. अध्यक्ष मुनिर पटेल यांची उपस्थिती होती. किसन मंच कार्यकारी समिती महाराष्टÑ च्या वतीने शेतकºयांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी, शेतमजूर सुरक्षाअभियान राबविण्यात येत असल्याचे धोंडगे यांनी सांगितले. हे अभियान ५५ दिवसांचे असून यात एकूण ८ प्रकारच्या मागण्यांचा समावेश आहे. आज घडीला वारंवार सरकार निर्णय घेत असल्याने या चुकीच्या धोरणामुळे शेतकºयांचे आतोनात नुकसान होत चालले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. कुठल्याही अटी व निकष न लावता सन २०१७ पर्यंतच्या शेतकºयांना कर्जातून मुक्त करावे. तर राज्याच्या व केंद्राच्या शेतीमालाला भाव ठरविणाºया समितीला घटनात्मक अधिकार देऊन शेतीमालाला कायद्याप्रमाणे योग्य भावाची हमी द्यावी, शिवाय शेतकºयांनाही व्यवसायिकाप्रमाणे तारण जमिनीच्या मुल्यांकनाच्या ७० टक्के एवढे कर्ज उपलब्ध करुन द्यावे आदी मागण्यासाठी हे अभियान राबविले जात असल्याचे धोंडगे यांनी सांगितले. ९ आॅगस्ट पासून अभियानास प्रारंभ झाला असून, राज्यातील ३० जिल्ह्यात फिरुन २ आॅक्टोबर रोजी सरकारच्या विरोधात असहकार आंदोलनानंतर समारोप केला जाणार आहे.

Web Title: The government really makes odd decisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.