आयएसओ मिळाले; आता जनतेचा विश्वास जिंका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:00 AM2017-08-17T01:00:51+5:302017-08-17T01:00:51+5:30

ठाण्यांना आयएसओ मिळाले ही अभिनंदनीय बाब आहे. केवळ ठाण्याची इमारत सुसज्ज, परिसर चकाचक झाला म्हणजे काम संपले असे नाही,

 Got ISO; Now win the faith of the people! | आयएसओ मिळाले; आता जनतेचा विश्वास जिंका !

आयएसओ मिळाले; आता जनतेचा विश्वास जिंका !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ठाण्यांना आयएसओ मिळाले ही अभिनंदनीय बाब आहे. केवळ ठाण्याची इमारत सुसज्ज, परिसर चकाचक झाला म्हणजे काम संपले असे नाही, तर हा मान टिकवून ठेवण्याबरोबरच सर्वसामान्यांना सेवा देण्याची खरा कस लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी प्रामाणिक काम करून जनतेचा विश्वास जिंका, असा कानमंत्र औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांनी आयएसओ मानांकन प्राप्त ठाणेप्रमुखांना दिला.
बीड जिल्हा पोलीस दलातील १२ पोलीस ठाण्यांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. याचे प्रमाणपत्र वितरण सोहळ्याबरोबरच ठाणेप्रमुखांचा कौतूक सोहळा बुधवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडला. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, पोलीस उपअधीक्षक मंदार नाईक, अभिजित पाटील, सुधीर खिरडकर, डॉ.विशाल आनंद, अर्जुन भोसले, परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक अनुराधा गुरव, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, नायब तहसीलदार दळवी आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. पोलीस दलात अनेक महिन्यानंतर एवढा मोठा कार्यक्रम झाला.
पुढे बोलताना भारंबे म्हणाले, एकदाच एवढे मोठे प्रमाणपत्र पटकावणे सोपे नाही. परंतु ही किमया बीड जिल्हा पोलीस दलाने करून दाखविली हे कौतुकास्पद आहे. मी सांगलीला असताना २२ पोलीस ठाणी व सहा पोलीस उपविभागीय कार्यालये एकाचवेळी आयएसओ केली होती. आज पुन्हा तो सोनेरी दिवस बीड जिल्ह्यात उजाडल्याचे सांगत त्यांनी जिल्हा पोलीस दलाची पाठ थोपटली. ठाण्यात येणाºया सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आणि वेळेच्या आत सेवा द्या, त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करा. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, लहान मुले अशा वेगवेगळ्या स्तरातील, घटकातील लोक ठाण्यात आले की, त्यांना पहिला आधार द्या, तरच ते आपले म्हणने व्यवस्थित मांडू शकतील. आयएसओ मानांकन प्राप्त केले म्हणजे किल्ला सर केला, असे नाही, तर ही चांगली सेवा देण्याची पहिली पायरी आहे, असे समजा. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून काम करा, असा सल्लाही देत आपण पोलीस दलात काम करीत असल्याची जाणीव ठेवण्याबद्दल कानमंत्र दिला.
सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले. बीड ग्रामीण पोलिसांच्या वतीने दारुबंदी व एक गाव एक गणपती संदर्भातील जनजागृतीविषयक भित्तीपत्रकाचे विमोचन भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस उप अधीक्षक सुधीर खिरडकर, अनुराधा गुरव, सपोनि शीतलकुमार बल्लाळ उपस्थित होते. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, पोलीस मित्र, नागरिक, महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
उत्साह कौतुकास्पद
प्रत्येक ठाण्यातील अधिकारी, कर्मचाºयांमधील उत्साह खरोखरच कौतुकास्पद आहे. टीमवर्कनेच यशाचे शिखर पार करता आले, असे सांगत भारंबे यांनी ठाणेप्रमुखांचा आणखी मनोबल वाढवित त्यांना पाठबळ दिले.
कौतुक अन् गुणगौरव सोहळा
दहावी, बारावीसह इतर क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी, उत्कृष्ट पोलीस पाटील, पोलीस मित्र, ठाणे प्रमुख, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह सर्व ठाणेप्रमुखांचा गौरव व कौतुक सोहळा उत्साहात पार पडला.

 

Web Title:  Got ISO; Now win the faith of the people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.