गुडईअर, सार्वजनिक बांधकाम संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:39 AM2018-03-17T00:39:00+5:302018-03-17T00:40:01+5:30

एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत गुडईअरने आय.जी.टी.आर. संघावर ४ गडी राखून मात केली. अन्य लढतींत सार्वजनिक बांधकाम विभागाने वैद्यकीय प्रतिनिधी संघाचा, डी.आय.ए.जी.ई.ओ.ने एमआयटी हॉस्पिटल संघावर विजय मिळवला. आज झालेल्या सामन्यात संतोष राऊत, ऋषिकेश तरडे, नीरज देशपांडे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.

Goodair, Public Works Team won | गुडईअर, सार्वजनिक बांधकाम संघ विजयी

गुडईअर, सार्वजनिक बांधकाम संघ विजयी

googlenewsNext
ठळक मुद्देसंतोष राऊत, ऋषिकेश तरडे, नीरज देशपांडे सामनावीर

औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत गुडईअरने आय.जी.टी.आर. संघावर ४ गडी राखून मात केली. अन्य लढतींत सार्वजनिक बांधकाम विभागाने वैद्यकीय प्रतिनिधी संघाचा, डी.आय.ए.जी.ई.ओ.ने एमआयटी हॉस्पिटल संघावर विजय मिळवला. आज झालेल्या सामन्यात संतोष राऊत, ऋषिकेश तरडे, नीरज देशपांडे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.
पहिल्या सामन्यात डीआयएजीईओ संघाविरुद्ध एमआयटीने १६.३ षटकांत सर्वबाद ९४ धावा केल्या. त्यांच्याकडून धीरज थोरातने ३५ चेंडूंत ७ चौकारांसह ४३, तर साईनाथ डहाळेने १४ धावा केल्या. डीआयएजीईओतर्फे संतोष राऊतने ११ धावांत ३ गडी बाद केले. त्याला तोडीची साथ देत हर्षवर्धन काळे याने २० धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात डीआयएजीईओने विजयी लक्ष्य १९ षटकांत ५ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून मिथुन रामगीरवार याने २४ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह २७ व संतोष राऊतने नाबाद १५ धावा केल्या. एमआयटीतर्फे रोहन शहा याने १४ धावांत ३ व आकाश लोखंडे व साईनाथ डहाळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात गुडईअरविरुद्ध आयजीटीआरने २० षटकांत ५ बाद १३८ धावा केल्या. त्यांच्याकडून ऋषिकेश तरडे याने ५९ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ५९ धावा केल्या. गौरव शिंदेने ४३ चेंडूंत ६ चौकारांसह ४६ धावांचे योगदान दिले. गुडईअरकडून कमलेश कालवावे याने २७ धावांत २ गडी बाद केले. प्रदीप यादव व अजित महालिंगा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात गुडईअरने विजयी लक्ष्य १७.२ षटकांत ६ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून जालिंदर हिवराळेने ३१ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ३८ धावा केल्या. प्रदीप यादवने २१ व असिफ खानने १९ धावांचे योगदान दिले. आयजीटीआरकडून महेश वझे व ऋषिकेश तरडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. यासाठी त्यांनी अनुक्रमे १६ व २२ धावा मोजल्या.
तिसºया सामन्यात वैद्यकीय प्रतिनिधी अ संघाने प्रथम फलंदाजी करताना १९ षटकांत सर्वबाद ११६ धावा केल्या. त्यांच्याकडून सौरभ लड्डा याने ५२ चेंडूंत ८ चौकार, २ षटकारांसह नाबाद ७० धावा केल्या. विनोद शाहूराजेने ३ चौकारांसह १८ धावांचे योगदान दिले. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नीरज देशपांडेने ९ धावांत ४ गडी बाद केले. मनोज घोडेके व रवींद्र तोंडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. यासाठी त्यांनी अनुक्रमे १८ व १९ धावा मोजल्या. प्रत्युत्तरात सार्वजनिक बांधकाम विभागाने विजयी लक्ष्य १५.३ षटकांत पूर्ण केले. त्यांच्याकडून योगीराज चव्हाण याने चौफेर टोलेबाजी करीत २२ चेंडूंतच ३ चौकार व ३ टोलेजंग षटकारांसह ४० धावांची स्फोटक खेळी केली. अजिंक्य दाभाडे, रवींद्र तोंडे, मनोज घोडके आणि योगेश राठी यांनी प्रत्येकी १३ धावांचे योगदान दिले. वैद्यकीय प्रतिनिधी अ संघाकडून आनंद वाडशेलारने २६ धावांत ३ गडी बाद केले. विनोद शाहूराजे, महेश जाधव आणि सौरभ लड्डा यंनी प्रत्येकी १ गडी बाद केला. आज झालेल्या सामन्यात पंच म्हणून विष्णू बब्बीरवार, गंगाधर शेवाळे, महेश सावंत, उदय बक्षी यांनी काम पाहिले. गुणलेखन राजेश भिंगारे व अजित कुमार यांनी केले.

Web Title: Goodair, Public Works Team won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.