गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 05:26 PM2018-10-16T17:26:18+5:302018-10-16T17:26:58+5:30

अत्यल्प पावसामुळे गंगापूर तालुक्यातील खरिपाची पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्यावतीने तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Gangapur taluka declared drought | गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करा

गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करा

googlenewsNext

वाळूज महानगर : अत्यल्प पावसामुळे गंगापूर तालुक्यातील खरिपाची पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्यावतीने तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यंदा खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी उसणवारी करुन जून महिन्यात कापूस, मका, बाजरी आदींची पेरणी केली. मात्र, पेरणीनंतर जवळपास महिनाभर पावसाने दडी मारल्यामुळे पिके पाण्याअभावी करपली. सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकºयांना विहिरी, बोअरचे पाणी देऊन या हंगामातील पिके कशी-बशी जगविली होती. यानंतर महिनाभरानंतर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने पिकांना जिवदान मिळाले. मात्र, संपूर्ण पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे उत्पादनाची मोठ्या प्रमाणात घट झाली असून, शेतकºयांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. खरीप हंगामात जेमतेम उत्पादन झाल्याने कर्ज व उसणवारी केलेले पैसे कसे फेडावे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. परिसरातील टेंभापुरी मध्यम प्रकल्पासह अनेक गावांतील पाझर तलावात जलसाठा न झाल्यामुळे शेतकºयांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. परतीच्या पावसानेही दगा दिल्यामुळे रब्बी हंगामही वाया जाण्याची भिती शेतकºयातून वर्तविली जात आहे.
महसूल विभागातर्फे गंगापूर तालुक्यात पीक पाहणी केली असता तालुक्याची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गंगापूर तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्याची मागणी निवदेनात करण्यात आली आहे. निवेदनावर युवक काँग्रेसचे महासचिव सय्यद अलीम यांच्यासह पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Gangapur taluka declared drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.