गॅसनिर्मितीसाठी चार कंपन्या इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:57 AM2018-08-15T00:57:27+5:302018-08-15T00:57:46+5:30

इंदूर महापालिकेने सडलेल्या पालेभाज्या, फळांपासून सीएनजी गॅसनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. याच धर्तीवर औरंगाबाद महापालिका ३० टन क्षमतेचा प्रकल्प कांचनवाडी येथे उभारणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध झाल्या असून, मंगळवारी इच्छुक कंपन्यांसोबत प्री बीड बैठक घेण्यात आली. कंपन्यांनी वार्षिक उलाढालीचा आकडा कमी करावा, जॉइंट व्हेंचरची परवानगी द्यावी, अशी माणगी केली.

Four companies wanting to make gas | गॅसनिर्मितीसाठी चार कंपन्या इच्छुक

गॅसनिर्मितीसाठी चार कंपन्या इच्छुक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औैरंगाबाद : इंदूर महापालिकेने सडलेल्या पालेभाज्या, फळांपासून सीएनजी गॅसनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. याच धर्तीवर औरंगाबाद महापालिका ३० टन क्षमतेचा प्रकल्प कांचनवाडी येथे उभारणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध झाल्या असून, मंगळवारी इच्छुक कंपन्यांसोबत प्री बीड बैठक घेण्यात आली. कंपन्यांनी वार्षिक उलाढालीचा आकडा कमी करावा, जॉइंट व्हेंचरची परवानगी द्यावी, अशी माणगी केली.
मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. बैठकीत महिंद्रासह अन्वी इन्व्हायरन्मेंट, बिस्कॉन आणि आणखी एका कंपनीने सहभाग घेतला. यावेळी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मनपाकडे दोन प्रमुख मागण्या केल्या. कोणत्याही कंपनीची वार्षिक उलाढाल १५ कोटी असावी अशी अट मनपाने टाकली आहे. वार्षिक उलाढालीचा आकडा कमी करावा. मोठ्या कंपनीसोबत जॉइंट व्हेंचरमध्ये काम करण्याची परवानगी द्यावी अशी लेखी मागणी केली. मनपा आयुक्तांनी तूर्त कोणालाही आश्वासन दिलेले नाही.

Web Title: Four companies wanting to make gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.