फूल तो अब भी खिलते हैं; खुशबू तेरे साथ गयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:19 PM2019-07-09T12:19:37+5:302019-07-09T12:26:44+5:30

औरंगाबादचे भूषण, शायर बशर नवाज यांचा आज चौथा स्मृतिदिन. यानिमित्त बशरसाहेबांचे चाहते डॉ. संदीप शिसोदे यांनी त्यांच्या जागविलेल्या आठवणी.

'Flowers still bloom; Fragrance added to you' death anniversary of Shayar Bashar nawaj | फूल तो अब भी खिलते हैं; खुशबू तेरे साथ गयी

फूल तो अब भी खिलते हैं; खुशबू तेरे साथ गयी

googlenewsNext

‘‘सिर्फ हम ही नहीं हर 
एक ने जीने के लिए
चंद ख्वाबों के खिलौनों से 
बहलना चाहा’’

हो हो यापलीकडे काय आहे, ते म्हणजे शब्दांची पकड. त्याची खोली. त्या शब्दांची ताकद आणि ती जाणून तिला चपखल जागी बसवण्याची कसब. ही फक्त बशर नवाज साहेब सारख्या जोहरीकडेच असू शकते. याचा प्रत्यय त्यांच्या गजलमध्ये येतो. वारंवार वाचताना येणारा नवनवीन अनुभव जबरदस्त असतो. आज त्यांची चौथी  पुण्यतिथी. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण, आठवणी ताज्या झाल्या. त्यांच्यासोबतचाक्षण म्हणजे एक नवा अनुभव समृद्ध करणारा. ऊर्जा देणारा मानसिक ताकद देणारा सामर्थ्याचा अनुभव.
 

‘‘धूप पी पी के झुलस जाये जमी... तब बरसे हैं घटाओं के भी अंदाज निराले कितने’’

बशर साहेबांचे राहणीमान अगदी साधे-सरळ; पण त्यांच्या गजलेत बेभान होऊन निघालेले शब्द म्हणजे एक दिव्य अनुभव. वरचे शब्द द्या धूप पी पी के झुलस जमीन बापरे काय आहे हे वर आग ओकणारा सूर्य आणि एकेक थेंबासाठी तहानलेली जमीन किती सत्वपरीक्षा आहे. यानंतर भावविभोर होऊन उठलेले आभाळ, बरसणारे आभाळ, कोसळणारं आभाळ किती छोटं किती रंग. प्रत्येक शब्द एक नवा शब्दकोश तयार होईल, असा बाबा म्हणायचे. त्यांना, सगळे बाबा बाबा म्हणजे वडील-वडील समान म्हणजे बाप गजलेचा या अर्थाने...
त्या नजाकततेचा शब्द सौंदर्याचा खजाना म्हणजे बाबा 
एका गजलेत ते म्हणतात,
‘‘नजरें ठहर-ठहर गई रंगे लिबास देखकर 
किसको पता चला मगर अपने ही खून में तर थे हम’’

 

खरंच आहे ना आपण स्वत:मध्ये इतके गर्क असतो, गुंतलेलो असतो की, आपल्याला इतर कोणाची काही चिंता, काळजी नसते; पण हे मांडता येणे हीच खुबी होती बाबांच्या शब्दांची. वास्तवाची जाणीव, वास्तवाचं भान आणि सगळ्या परिस्थितींवर असलेलं त्यांचं सडेतोड जबाब म्हणजेच बाबा गजल वाचून समजायला लागली आणि बाबा आपल्यातून ते त्यांच्या दुनियेत गेले आणि आपल्या सर्वांना सोडून गेले. त्यांच्या आठवणी आपल्यापाशी सोडून गेले. त्यांच्या गजल नजम शेर रूपात त्यांच्या शब्दांमधून ते-
‘‘वो रुत बीती बात गयी
सपनों जैसी रात गयी,
अश्कों का तो कुछ न गया
आबरू-ए-जज्बात गयी,
अब के भी हम मिल न सके
अब के भी बरसात गयी,
फूल तो अब भी खिलते हैं
खुशबू तेरे साथ गयी’’

 

बशर नवाज साहेब यांच्याकडं अधून-मधून जाणं व्हायचं. पहिल्यांदा त्यांच्यावरच्या डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने त्यांची भेट झाली. उर्दू शेर गजल यापासून कोसोदूर असलेल्या मी पण त्या रात्री बशर साहेबांनी त्यांच्या तोंडून  आवडीचा शेर काढला आणि तो असा...
‘‘नींद रुठे हुए लोगों को मनाना ही है,
आंख खोलूंगा तो वो फिर से बिछड जायेंगे’’

हा शेर मनाला भिडला आणि उर्दू गजल शेरच्या प्रेमात पडलो. बाबांची शेर गजल आणि नजर या वास्तव आयुष्य, प्रेम वास्तव आणि स्वप्न यावर आधारित आहेत. त्यांची इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू ,अरबी या भाषांवर  कमांड होती.

- डॉ. संदीप शिसोदे

Web Title: 'Flowers still bloom; Fragrance added to you' death anniversary of Shayar Bashar nawaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.