लग्नाकार्यात रूजतोय ‘फ्लॉवर पॅटर्न’चा ट्रेंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 10:10 PM2019-06-08T22:10:09+5:302019-06-08T22:10:54+5:30

अबोली कुलकर्णी औरंगाबाद : लग्नकार्य म्हटल्यावर बँड, बाजा आणि वºहाडींसोबत लक्षवेधी ठरते ती आकर्षक फुलांची सजावट. विविधरंगी असलेली ही ...

Flower Pattern's Trend In Marriage! | लग्नाकार्यात रूजतोय ‘फ्लॉवर पॅटर्न’चा ट्रेंड!

लग्नाकार्यात रूजतोय ‘फ्लॉवर पॅटर्न’चा ट्रेंड!

googlenewsNext
ठळक मुद्देसजावट : आॅर्चिड, ट्युलिप्स, अँथ्रेम फुलांचे वाढले भाव; ‘सायकल सेल्फी पॉइंट’ला विशेष पसंती


अबोली कुलकर्णी
औरंगाबाद : लग्नकार्य म्हटल्यावर बँड, बाजा आणि वºहाडींसोबत लक्षवेधी ठरते ती आकर्षक फुलांची सजावट. विविधरंगी असलेली ही फुले आमंत्रितांच्या स्वागतासाठीच जणू सज्ज असतात. यंदाच्या लग्नसराईत मात्र शहरात एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळाला, तो म्हणजे फुलांच्या आगळ्यावेगळ्या डिझाईन पॅटर्नचा. या पॅटर्नसाठी वापरली जाणारी फुले ही अत्यंत महागडी, विदेशातून आयात केलेली; पण तेवढीच आकर्षक अशी असतात. विशेष म्हणजे अशा पॅटर्नची मागणी आयोजकांकडून करण्यात येत आहे. जास्तीत जास्त महागडी फुले आणि हटके पॅटर्न यंदाच्या लग्नसराईतील ‘स्टेटस सिम्बॉल’ ठरले आहेत.
शहरात सध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे. घरात लग्नकार्य म्हटले की, विविध प्रकारच्या तयारीला, जमवाजमवीला उधाण येते. नवरदेव-नवरीची तयारी, बस्ता, पाहुण्यांची तयारी, मंगलकार्य ठरवणे अशा एक ना अनेक तयारी करण्यात आयोजक व्यस्त असतात. मात्र, त्यासोबतच महत्त्वाची असते ती मंगलकार्यातील आकर्षक सजावटही. रंगीबेरंगी लायटिंग, आकर्षक फुलांची सजावट हे आमंत्रितांचे लक्ष वेधून घेतात. यंदा लग्नसराईत पाहावयास मिळालेल्या ट्रेंडमध्ये मंगलकार्यातील आमंत्रितांच्या प्रवेशाच्या ठिकाणी रंगीबेरंगी, आकर्षक फुलांचे पॅटर्न बनवून लावण्यात येतात. यात एकप्रकारची थीम असते. ट्युलिप्स (२५० रुपये), अँथ्रेम (७० रुपये), आॅर्चिड (८० रुपये), निलम (१५० ते २०० रुपये) किसानमुंत्री (९० रुपये) अशी महागडी फुले वापरली जातात. त्यासोबतच काही ठिकाणी फुलांचे स्टॅण्डस् बनवले जातात. तसेच ‘सायकल सेल्फी पॉइंट’ बनवून तिथेदेखील अशाच आकर्षक फुलांसह सजावट केली जाते. लग्नात सहभागी झालेल्या युवा, महिला आणि इतर मंडळींना तेथे जाऊन सेल्फी काढण्याचा आनंद लुटता येते. या पॅटर्नच्या फुलांमध्ये आॅर्चिड, ट्युलिप्स, अँथ्रेम यासारखी महागडी फुले वापरली जातात. जेवढी ही फुले महाग तेवढी प्रतिष्ठेत भर पडते, अशी ग्राहकांची मानसिकता असते. त्यामुळे ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणूनही या नव्या ट्रेंडला पाहू लागले आहेत.
 

Web Title: Flower Pattern's Trend In Marriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.