पाच टक्के औरंगाबादकरांना काचबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 11:23 PM2019-03-09T23:23:15+5:302019-03-09T23:25:11+5:30

डोळ्याच्या आतमध्ये वाढलेला दाब म्हणजे काचबिंदू (ग्लॉकोमा) होण्याची धोक्याची घंटा असते. त्या दाबामुळे दृष्टी चेतातंतू दाबले जाऊन आतील बाजूला इजा होते. काचबिंदूचा आजार नियंत्रित करता येत असला तरी ५ टक्के औरंगाबादकर या आजाराने ग्रासले आहेत. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास अंधत्व येण्याची भीती असते, असे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.

Five percent Aurangabad to get glaucoma | पाच टक्के औरंगाबादकरांना काचबिंदू

पाच टक्के औरंगाबादकरांना काचबिंदू

googlenewsNext
ठळक मुद्देजागतिक काचबिंदू सप्ताह : चोरपावलांनी येणारा आजार, उपचाराअभावी अंधत्वांचा धोका


औरंगाबाद : डोळ्याच्या आतमध्ये वाढलेला दाब म्हणजे काचबिंदू (ग्लॉकोमा) होण्याची धोक्याची घंटा असते. त्या दाबामुळे दृष्टी चेतातंतू दाबले जाऊन आतील बाजूला इजा होते. काचबिंदूचा आजार नियंत्रित करता येत असला तरी ५ टक्के औरंगाबादकर या आजाराने ग्रासले आहेत. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास अंधत्व येण्याची भीती असते, असे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.
१० ते १६ मार्चदरम्यान जागतिक काचबिंदू सप्ताह पाळण्यात येत आहे. जनजागृतीमुळे मोतीबिंदूविषयी सर्वसामान्यांना माहिती आहे. डोळ्यात दिसणाऱ्या डागामुळे मोतीबिंदू लगेच लक्षात येतो; परंतु काचबिंदू सहज लक्षात येत नाही. काचबिंदू हा आजार चोरपावलांनी येणारा आजार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे डोळ्यातील नसांवर (आॅप्टिक नर्व्ह) दुष्परिणाम होऊन दृष्टी कमी होते. उपचार घेण्याकडे दुर्लक्ष केल्यास कायमची दृष्टी जाण्याचा धोका असतो. काचबिंदू हा कधी कळत नाही. वयाच्या ३५ वर्षांपासून वर्षातून एकदा डोळ्यांची नियमित तपासणी करावी, असे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी केले.
आजार लक्षात येत नाही
मोतीबिंदू हा लगेच लक्षात येतो; परंतु काचबिंदू लगेच लक्षात येत नाही. हा आजार हळूहळू वाढतो. यात डोळ्यावर ताण वाढतो. यावर औषधोपचार के ला जातो; परंतु औषधोपचाराने फरक पडला नाही तर शस्त्रक्रियेची वेळ येते, असे जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. गोल्हाईत यांनी सांगितले.
चाळिशीनंतर अधिक धोका
काचबिंदूच्या रुग्णांचे प्रमाण चार ते पाच टक्के आहे. वयाच्या चाळिशीनंतर हा आजार होण्याचे प्रमाण अधिक आहे. वेळेवर उपचाराअभावी दृष्टी जाण्याचा धोका असतो, अशी माहिती नेत्रतज्ज्ञ आणि औरंगाबाद नेत्रतज्ज्ञ संघटनेचे कोषाध्यक्ष केदार नेमीवंत यांनी दिली.
हळूहळू अंधत्व
काचबिंदूमुळे हळूहळू अंधत्व वाढत जाते. घरातील सदस्यांना काचबिंदू असेल तर कुटुंबातील सदस्यांनीही वेळीच खबरादारी घेतली पाहिजे. त्याबरोबर मधुमेह रुग्णांनाही काचबिंदू होण्याची अधिक शक्यता असते. कमी वयातही काचबिंदू आढळत आहे, असे नेत्रतज्ज्ञ डॉ. सोनाली भांगे यांनी सांगितले.

काचबिंदूची लक्षणे
डोळे दुखणे, डोळे लाल होणे, अंधूक दिसणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, दिव्याभोवती वर्तुळे दिसणे.
काचबिंदू कोणाला होऊ शकतो?
- कुटुंबात कोणाला काचबिंदू झालेला असल्यास अनुवंशिकतेमुळे शक्यता.
- ४० वर्षांवरील व्यक्तींना.
- मधुमेह, रुक्तदाबाचे रुग्ण.
- डोळ्यांना दुखापत झाल्यास.

Web Title: Five percent Aurangabad to get glaucoma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.