पुढे जायच की मागे; हे अगोदर ठरवा; ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचा 'डार्विनचा सिद्धांत' वादावर टोला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 04:33 PM2018-01-22T16:33:24+5:302018-01-22T18:13:36+5:30

आपणास पुढे जायचे आहे की मागे, हे अगोदर ठरवून घेतले पाहिजे. डार्विनचा सिद्धांत थेअरी नाही. त्यात वैज्ञानिक तथ्य आहे. त्याच्या आधारावर लोकांनी अंदाज बांधले. ते अंदाज खरे ठरले आहेत. माझ्याकडे काही जुनं आहे, त्याला याचा काही आधार सापडत नाही म्हणून ते चुक आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे परखड मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

firstly decide go ahead or back; Senior Scientist Anil Kakodkar's opinion on 'Darwin's theory' debate | पुढे जायच की मागे; हे अगोदर ठरवा; ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचा 'डार्विनचा सिद्धांत' वादावर टोला  

पुढे जायच की मागे; हे अगोदर ठरवा; ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचा 'डार्विनचा सिद्धांत' वादावर टोला  

googlenewsNext
ठळक मुद्दे केंद्रीय मनुुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपालसिंग यांनी  डार्विनचा सिद्धांत चुकीचा असल्याचा दावा औरंगाबादेतील वैदिक संमेलनात बोलताना केला होता. याबाबत डॉ. काकोडकर यांना विचारले असता ते म्हणाले, आपणाला पुढे जायचे की मागे जायचे हे ठरवून घेतले पाहिजे असे मत व्यक्त केले

औरंगाबाद : आपणास पुढे जायचे आहे की मागे, हे अगोदर ठरवून घेतले पाहिजे. डार्विनचा सिद्धांत थेअरी नाही. त्यात वैज्ञानिक तथ्य आहे. त्याच्या आधारावर लोकांनी अंदाज बांधले. ते अंदाज खरे ठरले आहेत. माझ्याकडे काही जुनं आहे, त्याला याचा काही आधार सापडत नाही म्हणून ते चुक आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे परखड मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद येथील छत्रपती शाहु महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘इंडस्ट्री अकॅडेमिया एन्गेजमेंट समिट-२०१८’चे पारितोषिक वितरण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर डॉ. काकोडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. केंद्रीय मनुुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपालसिंग यांनी  डार्विनचा सिद्धांत चुकीचा असल्याचा दावा औरंगाबादेतील वैदिक संमेलनात बोलताना केला होता. याविषयी आणि सध्या सर्वत्र धर्माच्या नावावरच सिद्धांत नाकारण्याचे प्रकार घडत असल्याबाबत डॉ. काकोडकर यांना विचारले असता ते म्हणाले, आपणाला पुढे जायचे की मागे जायचे हे ठरवून घेतले पाहिजे. भारताकडे पारंपरिक ज्ञान मोठे आहे. ‘वुई हॅव गे्रट सिट आॅफ नॉलेज’. ते पारंपरिक ज्ञान विविध प्रकारात आहे. हे ज्ञान तावूनसुलाखून बघितले पाहिजे. तसे न करता तुम्ही मला सांगितले म्हणून मी त्यावर विश्वास ठेवणे याला ज्ञानाचा मार्ग म्हणत नाहीत. हे लक्षात ठेवले पाहिजे. सांगायचा मुद्दा म्हणजे आपणाला पुढे जायचे की नाही हे ठरविलं पाहिजे. डार्विनचा सिद्धांत थेअरी नाही. त्यात वैज्ञानिक तथ्य आहे. त्याच्या आधारावर लोकांनी अंदाज बांधले. ते अंदाज खरे ठरले आहेत. माझ्याकडे काही जुनं आहे, त्याला याचा काही आधार सापडत नाही म्हणून ते चुक... अशा म्हणण्याला कोणताही आधार नाही, असे परखड मत डॉ. काकोडकर यांनी व्यक्त केले.

जैतापूरला वेळ लागण्याची शक्यता
कोकणातील जैतापूर येथे फ्र ान्सच्या मदतीने अणुप्रकल्प उभारण्यात येत आहे. या अणुप्रकल्पाच्या मदतीसाठी भारताने फ्र ान्सच्या ‘आरेवा’ कंपनीसोबत आतापर्यंत बोलणी केली होती. मात्र या कंपनीची विभागणी होऊन ‘इडिएफ’ कंपनी तयार झाली आहे. भारताला आता ‘इडिएफ’सोबत बोलणी करावी लागेल. यात काही कालावधी जाणार असल्याचेही डॉ. काकोडकर यांनी स्पष्ट केले.

व्हिडीओ पहा :

https://www.youtube.com/embed/uLhZ0n8xHsE

Web Title: firstly decide go ahead or back; Senior Scientist Anil Kakodkar's opinion on 'Darwin's theory' debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.