दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:18 AM2017-07-22T00:18:48+5:302017-07-22T00:21:31+5:30

परभणी : लॅपटॉपवर आकडे दाखवून चक्री नावाचा जुगार खेळविणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Filed in both cases | दोघांवर गुन्हा दाखल

दोघांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लॅपटॉपवर आकडे दाखवून चक्री नावाचा जुगार खेळविणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २० जुलै रोजी करण्यात आली.
जिंतूर शहरातील मराठवाडा हॉटेलच्या बाजूस लॅपटॉपवर चक्री नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती जिंतूर पोलिसांना मिळाली. यावरुन २० जुलै रोजी जिंतूर पोलिसांनी छापा टाकला. भारत फकिरा कोल्हे (रा.चिखलवाडी) हा लॅपटॉवर आकडे दाखवून चक्री नावाचा जुगार खेळवत असल्याचे आढळून आले. त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून रोख ७२० रुपये व पाच हजार रुपये किमतीचा लॅपटॉप जप्त केला. या प्रकरणी पोलीस नायक सुधाकर कुटे यांच्या फिर्यादीवरुन भारत कोल्हे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई शहरातील शिवाजी चौकातील सिमला लॉज परिसरात करण्यात आली. या ठिकाणी मनिष गोपाळ राठोड हा सुद्धा लोकांकडून पैसे घेऊन लॅपटॉपवर आकडे दाखवून चक्री नावाचा जुगार खेळत असताना आढळून आला. त्याच्याकडून ६ हजार ६४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस शिपाई व्यंकट नरवाडे यांच्या फिर्यादीवरुन मनिष राठोड याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
गॅस सिलेंडर, देशीदारु जप्त
जिंतूर शहरातील जिंतूर ते येलदरी या रस्त्यावर विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी दारुची विक्री करीत असताना ८३२ रुपये किंमतीच्या देशी दारुच्या १८० बाटल्या व २ हजार ५०० रुपये किंमतीचे इंडेन कंपनीचे गॅस सिलेंडर तसेच पान मसाल्याच्या २३ पुड्या पोलिसांनी जप्त केल्या. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Filed in both cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.