बनावट नोटा; आरोपींची कोठडी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:13 AM2017-08-19T00:13:41+5:302017-08-19T00:13:41+5:30

पन्नास लाख रुपयांच्या खºया नोटांच्या बदल्यात दोन कोटी रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पाचही आरोपींना पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

Fake notes; The accused's custody was extended | बनावट नोटा; आरोपींची कोठडी वाढली

बनावट नोटा; आरोपींची कोठडी वाढली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : पन्नास लाख रुपयांच्या खºया नोटांच्या बदल्यात दोन कोटी रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पाचही आरोपींना पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून ‘बच्चो के बँक’च्या खेळण्यातल्या नोटांसह वारंगाफाटा येथे एलसीबीच्या पथकाने १३ आॅगस्ट रोजी पाच जणांना अटक केली. आरोपी अफरोजखाँ जमीरखाँ पठाण, शेरखान मुनवरखॉन, शेख समीर शेख इलियास, शेख रहेमान शेख इस्माईल, मोहम्मद सदब, शेख महेबूब यांना न्यायालयापुढे हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. तपासिक अंमलदार फौजदार विनायक लंबे यांनी आरोपींची कसून चौकशी केली. शुक्रवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा हिंगोली न्यायालयापुढे हजर केले. तपासाची प्रगती ऐकून न्यायालयाने २२ आॅगस्टपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती लंबे यांनी दिली.
आणखी काही साथीदार
बनावट नोटा प्रकरणातील आरोपीची कसून चौकशी सुरू असून तपास योग्य दिशेने व गतीने सुरू आहे. या प्रकरणी आरोपींचे आणखीही तीन ते चार साथीदारांना अटक करणे बाकी आहे. त्याचसाठी आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती तपासिक अंमलदार विनायक लंबे यांनी दिली.

Web Title: Fake notes; The accused's custody was extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.