परीक्षा विभागात ‘अभाविप’चे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:55 AM2018-07-20T00:55:26+5:302018-07-20T00:56:39+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उघडकीस आलेल्या नापास विद्यार्थ्यांना पदवी वाटप प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परीक्षा भवनातील संचालकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेतर्फे परीक्षा संचालकांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली.

In the examination section 'ABVIP' stalled movement | परीक्षा विभागात ‘अभाविप’चे ठिय्या आंदोलन

परीक्षा विभागात ‘अभाविप’चे ठिय्या आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देनापास विद्यार्थ्यांना पदवी वाटप प्रकरण : परीक्षा संचालकांच्या राजीनाम्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उघडकीस आलेल्या नापास विद्यार्थ्यांना पदवी वाटप प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परीक्षा भवनातील संचालकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेतर्फे परीक्षा संचालकांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली.
‘लोकमत’ने १४ जुलै रोजी नापास विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आल्याचा भंडाफोड केला होता. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सलग तिसऱ्या दिवशी विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. ‘अभाविप’च्या पदाधिकाºयांनी गुरुवारी सकाळी १२ वाजेदरम्यान परीक्षा भवनातील परीक्षा संचालकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या दिला. कार्यालयात परीक्षा संचालक नसल्यामुळे एका खुर्चीवर दगड ठेवण्यात आला. तसेच परीक्षा संचालकांनी राजीनामा दिल्याशिवाय उठणार नसल्याची भूमिका घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता.
आंदोलनस्थळी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी धाव घेऊन कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. याच वेळी पोलीसही दाखल झाले. तेव्हा कुलसचिव डॉ. साधना पांडे म्हणाल्या, या प्रकरणात चौकशी समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले आहे. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात यावे, तेव्हा ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी लेखी लिहून देण्याच्या अटीवर आंदोलन मागे घेतले.
यावेळी प्रदेशमंत्री अभिजित पाटील, महानगर सहमंत्री विवेक पवार, महाविद्यालय प्रमुख शिवा देखणे, गोविंद देशपांडे, आरती तांदळे, सोनू क्षीरसागर, निखिल आठवले, श्याम कातखडे, प्रभाकर माळवे, शुभम स्नेही, आशिष वडोदकर, महेंद्र मुंडे, आशिष आणेराव, ज्ञानेश्वर उद्देवाल, नितीन केदार, गोरख केंद्रे, शिवाजी वरपे आदी उपस्थित होते.
साईनंतर काय सुधारणा झाली?
चौका येथील साई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रकरणात विद्यापीठाची राष्ट्रीय पातळीवर बदनामी झाली. तेव्हा परीक्षा विभागात अनेक बदल केले. मात्र एका वर्षाच्या आत सर्वच बदल पूर्ववत झाल्याचे दिसून येते. यामुळे परीक्षा संचालकांसह इतर दोषींवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अभाविपचे प्रदेशमंत्री अभिजित पाटील यांनी यावेळी केली.

Web Title: In the examination section 'ABVIP' stalled movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.