एव्हरेस्टवीर मनीषा लुकला येथे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:27 AM2018-05-25T00:27:22+5:302018-05-25T00:28:02+5:30

२१ मे रोजी सकाळी ८ वाजून १0 मिनिटांनी जगातील सर्वोच्च उंचीवरील शिखर माऊंट एव्हरेस्ट शिखर फत्ते करणारी पहिली मराठवाड्याची शिखरकन्या ठरणाऱ्या मनीषा वाघमारे हिचा परतीचा प्रवास सुरू झाला असून ती १ किंवा २ जून रोजी औरंगाबादला पोहोचणार आहे. इंडियन कॅडेट फोर्सची कॅडेट आणि महिला महाविद्यालयात क्रीडा संचालिका असणाºया प्रा. मनीषा वाघमारे बुधवारी दुपारी बेसकॅम्पवर पोहोचली होती.

Everestee Manisha Lukla here | एव्हरेस्टवीर मनीषा लुकला येथे दाखल

एव्हरेस्टवीर मनीषा लुकला येथे दाखल

googlenewsNext

औरंगाबाद : २१ मे रोजी सकाळी ८ वाजून १0 मिनिटांनी जगातील सर्वोच्च उंचीवरील शिखर माऊंट एव्हरेस्ट शिखर फत्ते करणारी पहिली मराठवाड्याची शिखरकन्या ठरणाऱ्या मनीषा वाघमारे हिचा परतीचा प्रवास सुरू झाला असून ती १ किंवा २ जून रोजी औरंगाबादला पोहोचणार आहे.
इंडियन कॅडेट फोर्सची कॅडेट आणि महिला महाविद्यालयात क्रीडा संचालिका असणाºया प्रा. मनीषा वाघमारे बुधवारी दुपारी बेसकॅम्पवर पोहोचली होती. पुरेसा प्राणवायू मिळावा आणि शरीराची झीज भरून निघावी यासाठी मनीषा वाघमारे बुधवारी रात्री बेसकॅम्प येथून नामचे बाजार येथे आली होती आणि ती गुरुवारी सायंकाळी लुकला येथे पोहोचली आहे. सध्या लुकला येथे हवामान प्रतिकूल असल्याने तेथून काठमांडू येथे जाण्यासाठी विमान वाहतूक बंद आहे. हवामान चांगले झाल्यानंतर मनीषा लुकला येथून काठमांडू येथे पोहोचणार आहे. कॅम्प २ वरून एव्हरेस्ट शिखर फत्ते केल्यानंतर दरम्यानच्या काळात मनीषाने एकदाही आहार घेतला नव्हता. त्यामुळे अशक्तपणा व थकवा आहे. तसेच उणे तापमानात मोहिमेदरम्यान झालेल्या जखमांमुळे डॉक्टरांनी तिला ३ ते ४ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Web Title: Everestee Manisha Lukla here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.