३०० कोटी येऊनही एटीएममध्ये खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:27 PM2019-04-16T23:27:53+5:302019-04-16T23:28:28+5:30

रिझर्व्ह बँकेने शहरासाठी मार्च महिन्यात ३०० कोटी रुपयांच्या नोटा पाठविल्या. मात्र, सध्याच्या घडीला अनेक एटीएममध्ये खडखडाट आहे. रोख रक्कम काढणाऱ्यांचा एवढा ओघ आहे की, नोटा भरताच दोन तासांतच एटीएम रिक्त होत आहेत.

Even after 300 crores, the ruckus in the ATM | ३०० कोटी येऊनही एटीएममध्ये खडखडाट

३०० कोटी येऊनही एटीएममध्ये खडखडाट

googlenewsNext
ठळक मुद्देरोख रकमेचे व्यवहार वाढले : नोटा भरताच दोन तासांत होतात एटीएम रिक्त

औरंगाबाद : रिझर्व्ह बँकेने शहरासाठी मार्च महिन्यात ३०० कोटी रुपयांच्या नोटा पाठविल्या. मात्र, सध्याच्या घडीला अनेक एटीएममध्ये खडखडाट आहे. रोख रक्कम काढणाऱ्यांचा एवढा ओघ आहे की, नोटा भरताच दोन तासांतच एटीएम रिक्त होत आहेत.
लग्नसराई, सुट्यांसाठी गावी जाणे, बुुकिंग करणे, धान्य खरेदी या बाबींबरोबरच निवडणुकीचे वातावरणही तापले आहे. यामुळे बँकेतून रोख रक्कम काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रिझर्व्ह बँकेने नागपूर येथून मार्च महिन्यातच शहरातील बँकांच्या पाच करन्सीचेस्टमध्ये सुमारे ३०० कोटी रुपयांच्या नोटा पाठविल्या होत्या. आजघडीला शहरात सर्व राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, सहकारी बँका मिळून ७०० एटीएम आहेत. यातील ५ टक्के एटीएम तांत्रिक बिघाडामुळे बंद आहेत. एसबीआयच्या दूधडेअरी चौक व शाहगंज येथील करन्सीचेस्टमधून दररोज प्रत्येकी १० कोटी रुपये एटीएमसाठी दिले जातात. अन्य तीन बँकांच्या करन्सीचेस्टमधूनही तेवढीच रक्कम एटीएमसाठी दिली जाते, असा दावा करन्सीचेस्टच्या अधिकाºयांनी केला. मात्र, आमच्या प्रतिनिधीने जालना रोड, कॅनॉट प्लेस, शाहगंज, औरंगपुरा, पुंडलिकनगर, गारखेडा परिसरातील काही एटीएम केंद्रांची पाहणी केली असता दुपारपर्यंत बहुतेक एटीएममध्ये खडखडाट असल्याचे दिसून आले. रवीकिरण देशपांडे या नागरिकाने सांगितले की, सिडकोतील पाच व गारखेडा परिसरातील दोन एटीएममध्ये जाऊन आलो; पण एकाही ठिकाणी रक्कम मिळाली नाही. यासंदर्भात करन्सीचेस्टमधील अधिकाºयांनी सांगितले की, आम्ही सकाळी एजन्सीकडे रक्कम देत असतो. एका एटीएममध्ये ३० लाख रुपये मूल्याच्या नोटा बसतात. २ हजार रुपयांची नोट रिझर्व्ह बँकेकडून येत नाही. ५०० रुपये, २०० रुपये व १०० रुपयांच्या नोटा एटीएममध्ये टाकण्यात येतात. या नोटांची संख्या वाढली आहे. चालू महिन्याच्या १ तारखेपासूनच एटीएममधून नोटा काढणाºयांची संख्या वाढली आहे. यामुळे दोन तासांत एटीएम खाली होत आहेत. निवडणुकीची मतमोजणी होईपर्यंत रिझर्व्ह बँक नोटांचा पुरवठा करणार नाही. यामुळे आम्हाला एटीएम आणि कॅश काऊंटर अशा दोन्हीकडे नोटा पुरवाव्या लागणार आहेत.
३० कोटींची नाणी बँकांत
रिझर्व्ह बँकेने मार्च महिन्यात ३० कोटींची नाणी बँकांमध्ये पाठविली आहेत. यात १ रुपया, २ रुपये, ५ रुपये व १० रुपयांची नाणी आहेत. बँकांमध्ये आधीच १० रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात पडून आहेत.
चौकट
दररोज काढली जाते एटीएममधून रक्कम
बँक अधिकाºयांनी सांगितले की, निवडणुका सुरू आहेत. बँकेत दैनंदिन होणाºया प्रत्येक मोठ्या व्यवहाराची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागत आहे. आयकर विभागाचीही नजर आहे. याशिवाय पोलिसांतर्फे शहरात वाहनांची तपासणीही केली जात आहे. सर्व व्यवहार बँकेमार्फत होत असले तरी पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी अनेक ग्राहक एटीएममधून दररोज थोडीथोडी रक्कम काढत आहेत. यामुळे कॅश काऊंटरपेक्षा एटीएमवरील ताण वाढला आहे.
 

Web Title: Even after 300 crores, the ruckus in the ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.