संविधानातील नीतिमूल्ये ही बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:49 PM2019-04-10T23:49:30+5:302019-04-10T23:50:42+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समता, स्वातंत्र आणि बंधुता ही लोकशाहीची तीन आधारमूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली आहेत, असा जाणीवपूर्वक खोटा आरोप आणि अपप्रचार केला जात आहे. बाबासाहेबांनी ही तीन आधारमूल्ये तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून संविधानात आधारभूत केलेली आहेत. हे तत्त्वज्ञान स्वदेशी आहे, ते पाश्चिमात्य देशाचे नाही, असे प्रतिपादन प्रा. श्रीकिशन मोरे यांनी केले.

The ethics of the Constitution is from the philosophy of Buddha | संविधानातील नीतिमूल्ये ही बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून

संविधानातील नीतिमूल्ये ही बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून

googlenewsNext
ठळक मुद्देप्रा. श्रीकिशन मोरे : मा.प. विधि महाविद्यालयात व्याख्यानमालेचे पहिले पुष्प


औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समता, स्वातंत्र आणि बंधुता ही लोकशाहीची तीन आधारमूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली आहेत, असा जाणीवपूर्वक खोटा आरोप आणि अपप्रचार केला जात आहे. बाबासाहेबांनी ही तीन आधारमूल्ये तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून संविधानात आधारभूत केलेली आहेत. हे तत्त्वज्ञान स्वदेशी आहे, ते पाश्चिमात्य देशाचे नाही, असे प्रतिपादन प्रा. श्रीकिशन मोरे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मा.प. विधि महाविद्यालयात तीनदिवसीय संविधान प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आज बुधवारी सायंकाळी ‘संविधान निर्मिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानवाद’ या विषयारील पहिले पुष्प प्रा. श्रीकिशन मोरे यांनी गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.एम. राव होते. सुरुवातीला प्रा. ललिता पवार यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले.
प्रा. मोरे आपल्या व्याख्यानात म्हणाले, २६ नोव्हेंबर १९५० रोजी भारतीय संविधान अमलात आले. त्यापूर्वी या देशातील समाजव्यवस्थेचा विचार झाला पाहिजे. या देशातील अस्पृशांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. अंगात वस्त्र परिधान करण्याचा अधिकार नव्हता. जनावरांपेक्षाही हीन दर्जाची वागणूक त्यांना दिली जात होती. देशात राजकीय स्वातंत्र्याची चळवळ अस्तित्वात होती; पण अस्पृशांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी सामाजिक चळवळ अस्तित्वात नव्हती. त्यामुळे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून या समाजाला अधिकार प्राप्त करून दिले. यापूर्वी १९३० मध्ये गोलमेज परिषेदसमोर बाबासाहेबांनी अस्पृशांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी लावून धरली. या मागणीला महात्मा गांधी यांनी कडाडून विरोध केला. एकीकडे महात्मा गांधी हे अस्पृशांच्या हक्कासाठी काम करीत आणि दुसरीकडे, अस्पृशांच्या अधिकाराला विरोध करीत. त्यामुळे बाबासाहेब हे गांधीजींचे वैचारिक विरोधक होते. बाबासाहेबांनी नोकरीत राखीव जागांचा आग्रह धरला, तसा मंत्रिमंडळातही राखीव जागांचा आग्रह धरला होता.
त्यानंतर संविधानसभेसमोर बाबासाहेबांनी आपले विचार प्रकट केले. तेथेही बाबासाहेबांना विरोध करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले; पण बाबासाहेब हे प्रकांड पंडित होते. मोठे कायदेपंडित होते. त्यांनी एकेक मुद्दा पटवून सांगितला. एकसंघ राष्ट्र कसे उभे राहील, याबद्दल सविस्तरपणे भूमिका मांडली. या देशातील महत्त्वाचे उद्योग हे राज्याच्या मालकीचे असावेत. कृषी क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. या देशातील संपूर्ण जमीन ही देशाच्या मालकीची असली पाहिजे व येथील नागरिकांना तिचे समान वाटप झाले पाहिजे. जमीन कसण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारने पैसे दिले पाहिजेत. बाबासाहेबांचा हा विचार जर अमलात आला असता, तर देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी रक्तविरहित सामाजिक क्रांती आणली, असे विचार प्रा. मोरे यांनी मांडले.

Web Title: The ethics of the Constitution is from the philosophy of Buddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.