मराठवाड्यातील वीज ग्राहकांची डिजिटल व्यवहारास पसंती; डिसेंबरमध्ये केला सव्वाशे कोटींचा आॅनलाईन बिल भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 01:11 PM2018-01-23T13:11:35+5:302018-01-23T13:14:22+5:30

औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या ११ जिल्ह्यांतील ३ लाख ४४ हजार १६९ वीज ग्राहकांनी डिसेंबर महिन्यात १२३ कोटी ७ लाख रुपये एवढे वीज बिल महावितरणच्या संकेतस्थळावरून, तसेच मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून भरणा केले आहे. 

Electricity consumers of Marathwada region preferred digital; In the December, online bill payment of Twenty-two hundred crores | मराठवाड्यातील वीज ग्राहकांची डिजिटल व्यवहारास पसंती; डिसेंबरमध्ये केला सव्वाशे कोटींचा आॅनलाईन बिल भरणा

मराठवाड्यातील वीज ग्राहकांची डिजिटल व्यवहारास पसंती; डिसेंबरमध्ये केला सव्वाशे कोटींचा आॅनलाईन बिल भरणा

googlenewsNext

औरंगाबाद : महावितरणने वीज ग्राहकांसाठी घरबसल्या कधीही आणि कोणत्याही ठिकाणाहून वीज बिल भरण्याची आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या ११ जिल्ह्यांतील ३ लाख ४४ हजार १६९ वीज ग्राहकांनी डिसेंबर महिन्यात १२३ कोटी ७ लाख रुपये एवढे वीज बिल महावितरणच्या संकेतस्थळावरून, तसेच मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून भरणा केले आहे. 

विशेष म्हणजे, ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वत:च्या अनेक वीज जोडण्यांचे बिल भरण्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. मोबाईल अ‍ॅपवरून वीज बिलांचा भरणा सहज करता येतो. महावितरणच्या या सुविधेमुळे नोव्हेंबरपेक्षा डिसेंबर महिन्यात ५८ कोटी ३३ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. 

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी कळविले आहे की, लघुदाब वीज ग्राहकांसाठी आॅनलाईन वीज बिल भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मोबाईल अ‍ॅपद्वारे मागील, तसेच चालू बिल पाहता येईल. बिल आॅनलाईन भरण्यासाठी नेटबँकिंग, क्रे डिट-डेबिट कार्डसह मोबाईल वॅलेट आणि कॅश कार्डचाही पर्याय उपलब्ध आहे. त्यावर वीज बिल भरल्याच्या पावतीचा तपशीलही मिळत आहे. महावितरण कंपनीकडून आॅनलाईन वीज बिल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. जनजागृतीमुळे ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 

औरंगाबाद परिमंडळात भरणा केलेले बीज बिल
परिमंडल     नोव्हेंबर           नोव्हेंबर                डिसेंबर            डिसेंबर 
                  ग्राहक संख्या    रक्कम                 ग्राहक संख्या    रक्कम  
औरंगाबाद    १,००,४१०        २१ कोटी ९ लाख     १,००,२७१    ३३ कोटी ३ लाख 
जळगाव       ९७,४८०    १९ कोटी १४ लाख            ९८,४२९    ३३ कोटी ५१ लाख 
लातूर            ८०,६७०    १३ कोटी ३३ लाख         ९२,३१५    ३३ कोटी ४५ लाख 
नांदेड            ४७,१२०    ११ कोटी ३७ लाख         ५३,१५४    २४ कोटी ८ लाख
एकूण        ३,२५,६८०    ६५ कोटी ७४ लाख       ३,४४,१६    १२४ कोटी ७ लाख

Web Title: Electricity consumers of Marathwada region preferred digital; In the December, online bill payment of Twenty-two hundred crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.