१६ हजारांपैकी अवघ्या ९१ शेतकऱ्यांना वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:15 PM2019-06-20T23:15:21+5:302019-06-20T23:15:58+5:30

कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी मागील दीड वर्षापासून पैसे भरलेले हजारो शेतकरी उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे देण्यात येणाºया वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. औरंगाबाद परिमंडळांतर्गत १६ हजार १८५ शेतकऱ्यांपैकी सध्या फक्त ९१ शेतकºयांनाच उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या माध्यमातून वीज जोडणी देण्यात आली आहे.

Electricity connections to 9 1 farmers in just 16 thousand | १६ हजारांपैकी अवघ्या ९१ शेतकऱ्यांना वीजजोडणी

१६ हजारांपैकी अवघ्या ९१ शेतकऱ्यांना वीजजोडणी

googlenewsNext
ठळक मुद्देमहावितरणची तत्परता : उच्चदाब वीज वितरण प्रणालीची दीड वर्षातील कामगिरी


औरंगाबाद : कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी मागील दीड वर्षापासून पैसे भरलेले हजारो शेतकरी उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे देण्यात येणाºया वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. औरंगाबाद परिमंडळांतर्गत १६ हजार १८५ शेतकऱ्यांपैकी सध्या फक्त ९१ शेतकºयांनाच उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या माध्यमातून वीज जोडणी देण्यात आली आहे.
यासंदर्भात महावितरणने कळविले आहे की, उच्चदाब प्रणालीअंतर्गत राज्यातील २ लाख २४ हजार शेतकरी, तर औरंगाबाद परिमंडळात १६ हजार १८५ शेतकºयांना वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ६ हजार १०१, तर जालना जिल्ह्यातील १० हजार ८४ शेतकºयांचा समावेश आहे. या शेतकºयांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणला सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचा अंदाजित खर्च येणार आहे. या योजनेंतर्गत वीजजोडणी देण्यासाठी ज्या शेतकºयांना अडीच लाखांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. अशा शेतकºयांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेद्वारे वीजपुरवठा देण्यात येणार आहे.
औरंगाबाद परिमंडळात उच्चदाब वीज वितरण प्रणाली राबविण्यासाठी कंत्राटदारांना जवळपास ३०६ कोटींचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत वीजपुरवठा देण्यासाठी प्रामुख्याने १०, १६ व २५ केव्हीए क्षमतेची १४ हजार ५२८ रोहित्रे लागणार आहेत. रोहित्रांची डिझाईन व टाईप चाचणीची मंजुरी मिळविणे, एवढ्या मोठ्या संख्येने रोहित्रांच्या निर्मितीसाठी साहित्याची पूर्वतयारी करणे, अशा काही तांत्रिक अडचणींमुळे उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी विलंब होत आहे. मात्र, राज्यात पहिल्यांदाच राबविण्यात येत असलेल्या या प्रणालीची कामे आता जोमाने सुरू झाली आहेत. येत्या काही दिवसांत या प्रणालीतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गती येणार असून, या प्रणालीतील कामे निर्धारित वेळेनुसार मार्च-२०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे महावितरणचे नियोजन आहे.
चौकट....
४५ कंत्राटदारांमार्फत सुरू आहेत कामे
या योजनेंतर्गत परिमंडळात औरंगाबाद जिल्ह्यातील ३५ व जालना जिल्ह्यातील ५६ शेतकºयांना वीजजोडणी देण्यात आली आहे. सध्या रोहित्रांची चांगल्या प्रमाणात उपलब्धता होत असल्याने कामांनी वेग घेतला आहे. परिमंडळात जवळपास ४५ कंत्राटदारांमार्फत ही कामे केली जात असून, कामाच्या प्रगतीसाठी कंत्राटदारांच्या नियमित बैठका घेण्यात येत आहेत. कंत्राटदारांना निविदानिहाय प्रत्येक महिन्यास २० रोहित्रे बसविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दरम्यान, सुरक्षा अनामत रक्कम न भरणाºया तीन कंत्राटदारांचे कार्यादेश महावितरणने रद्द केले आहेत.

Web Title: Electricity connections to 9 1 farmers in just 16 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.