औरंगाबाद आणि जालन्यात मतदान प्रक्रियेसाठी आयोगाची यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 06:17 PM2019-04-22T18:17:20+5:302019-04-22T18:18:35+5:30

जिल्हा प्रशासन, पोलीस, सीआयडीची यंत्रणा तैनात

Election commission's ready for voting in Aurangabad and Jalna alerted | औरंगाबाद आणि जालन्यात मतदान प्रक्रियेसाठी आयोगाची यंत्रणा सतर्क

औरंगाबाद आणि जालन्यात मतदान प्रक्रियेसाठी आयोगाची यंत्रणा सतर्क

googlenewsNext
ठळक मुद्दे २०२१ मतदान केंद्रे औरंगाबादेत तर १ हजार ४ मतदान केंद्रे जालना लोकसभेसाठी आहेत.

औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती रविवारी सायंकाळी एका संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी यांची यावेळी उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितले, २३ एप्रिल रोजी सकाळी ६ वा. उमेदवार प्रतिनिधींसमक्ष अभिरूप मतदान होईल. ७ वा. मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. १८ लाख ८६ हजार २८३ मतदार औरंगाबाद तर ९ लाख ३१ हजार ४०४ मतदार जालना लोकसभा मतदारसंघात आहेत. २०२१ मतदान केंद्रे औरंगाबादेत तर १ हजार ४ मतदान केंद्रे जालना लोकसभेसाठी आहेत. ३७०० कंट्रोल युनिट, ७ हजार ३६९ बॅलेट युनिट, ३ हजार ९७४ व्हीव्हीपॅट मतदान प्रक्रियेसाठी लागतील. ११६२ बॅलेट, ५३५ कंट्रोल युनिट आणि ७७४ व्हीव्हीपॅट आरक्षित ठेवण्यात आले आहेत. मतदान यंत्रात बिघाड झाल्यास ते २५ मिनिटांत बदलून मिळण्यासाठी व्यवस्था केल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला. 

व्होटर स्लीपचे वाटप पूर्ण झाले असून, ११ विविध प्रकारचे ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येतील. व्होटर स्लीप फक्त मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी ग्राह्य धरली जाईल. ३५०० स्वयंसेवक, १८ हजार ३११ दिव्यांग मतदारांसाठी ३०० रिक्षा नि:शुल्क सेवा देणार आहेत. यासाठी बीएलओंशी संपर्क करावा लागेल. यावेळी अपडेट मतदान यंत्रे आली आहेत. त्यांचे रिजेक्शनचे प्रमाण कमी आहे. १०० टक्के मतदान केंद्रावर महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसाधनगृहांची व्यवस्था झालेली नाही. जिल्ह्यात १ कोटींच्या आसपास रक्कम आचारसंहितेच्या काळात जप्त करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. मतदारसंघात १२ ठिकाणी महिला मतदान केंदे्र आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

पोलिसांचा बंदोबस्त असा  
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले, ११६८ मतदान केंद्रे शहरात आहेत. त्यात ८३ केंद्रे जालना मतदारसंघात आहेत. ३ पोलीस उपायुक्त, ८ सहा. पोलीस आयुक्त, ३० पोलीस निरीक्षक, १३० सहायक पोलीस निरीक्षक, २,८५४ पुरुष आणि ४०९ महिला पोलीस कर्मचारी मतदान प्रक्रियेत बंदोबस्ताला असतील. ८७० पुरुष, १४६ महिला कर्मचारी मतदान केंद्रांवर असतील. ६५९ होमगार्ड, ४ एसआरपी व पॅरामिल्ट्रीच्या तुकड्या, १५० अतिरिक्त कर्मचारी, ५ सीआयडी, २० बुथसाठी एक क्षेत्र अधिकारी नेमण्यात आला आहे. 

ग्रामीण पोलीस यंत्रणा अशी
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितले, १८९९ मतदान केंद्रे ग्रामीण भागात आहेत. त्यातील ९६३ औरंगाबाद तर ९३६ जालना लोकसभा मतदारसंघात आहेत. च्अपर अधीक्षक १, १२ पोलीस उपअधीक्षक, १२ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक २०४, पोलीस कर्मचारी २५००, एसआरपी व इतर दलाच्या ५ तुकड्या, १७५० होमगार्ड मतदान प्रक्रियेसाठी नेमले आहेत. पुढील दोन दिवस पेट्रोलिंग करण्यात येणार आहे.

Web Title: Election commission's ready for voting in Aurangabad and Jalna alerted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.