एका सरकारी अधिकाºयाची हरलेली लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 01:01 AM2017-07-26T01:01:10+5:302017-07-26T01:01:10+5:30

तीन महिन्यांपासून सुरू असलेली लढाई विजय दृष्टिक्षेपात दिसत असताना आम्ही हरलो, अशा भावनिक शब्दांत मुख्यमंत्र्यांचे सचिव ओमप्रकाश शेटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ekaa-sarakaarai-adhaikaaoyaacai-haralaelai-ladhaai | एका सरकारी अधिकाºयाची हरलेली लढाई

एका सरकारी अधिकाºयाची हरलेली लढाई

googlenewsNext
ठळक मुद्देशस्त्रक्रियेच्या दोन दिवस आधीच फैजानने जगाचा निरोप घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘मला मनापासून वाटत होते की, फैजान पूर्णपणे बरा होऊन इतर लहान मुलांसारखा खेळायला लागेल, पळायला लागेल; परंतु नियतीला ते मान्य नव्हते. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही आम्ही फैजानला वाचवू शकलो नाही. ही जेवढी फैजानची लढाई होती तेवढीच माझीदेखील होती. तीन महिन्यांपासून सुरू असलेली लढाई विजय दृष्टिक्षेपात दिसत असताना आम्ही हरलो, अशा भावनिक शब्दांत मुख्यमंत्र्यांचे सचिव ओमप्रकाश शेटे यांनी आपल्या भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
फैजान सय्यद या सहावर्षीय मुलाच्या दुर्दैवी मृत्यूविषयीचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रकाशित केले होते. विनाअनुदानित शाळेवर शिक्षक असलेल्या एजाज सय्यद यांचा मुलगा फैजान वयाच्या तिसºया महिन्यापासून ‘बायलेरी अ‍ॅट्रेशिया’ या यकृताच्या आजाराने ग्रस्त होता. यकृत प्रत्यारोपणासाठी लागणारा लाखो रुपयांचा खर्च ते करू शकत नव्हते. अशावेळी ओमप्रकाश शेटे यांनी मदतीचा हात पुढे करून आधुनिक उपचार व आर्थिक मदत दोन्ही उपलब्ध करून दिले; मात्र शस्त्रक्रियेच्या दोन दिवस आधीच सर्वांच्या मनाला चटका लावून फैजानने या जगाचा निरोप घेतला.
शेटे सांगतात, मुख्यमंत्री आवर्जून फैजानच्या तब्येतीची चौकशी करायचे. रात्री एक वाजतादेखील ते फैजानच्या उपचारांची माहिती विचारत. आम्ही सर्व १९ तारखेवर आशा लावून बसलेलो होतो; मात्र १६ जुलै रोजी त्याची तब्येत अचानक बिघडली. १७ तारखेच्या रात्री दोन वाजेपर्यंत मी सातत्याने दवाखान्याच्या संपर्कात होतो. या तीन महिन्यांच्या काळात फैजानचा लळा लागला होता.

Web Title: ekaa-sarakaarai-adhaikaaoyaacai-haralaelai-ladhaai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.