पावसाळ्यातही अनेक गावे तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:46 PM2019-07-15T23:46:31+5:302019-07-15T23:46:41+5:30

पावसाळ्यातही वाळूज महानगरातील अनेक गावे तहानलेलीच असून, त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

During the rainy season many villages thirsty | पावसाळ्यातही अनेक गावे तहानलेलीच

पावसाळ्यातही अनेक गावे तहानलेलीच

googlenewsNext

वाळूज महानगर : पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटला आहे. मात्र, अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जलस्त्रोत कोरडेच आहेत. त्यामुळे पावसाळ्यातही वाळूज महानगरातील अनेक गावे तहानलेलीच असून, त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशीच परिस्थिती रहिली तर येणाऱ्या काळात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत.


गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. पावसाळा सुरु होवून दीड महिना होत आला आहे. तरीही अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही. केवळ दोन-तीन वेळाच बºयापैकी पाऊस झाला आहे. परंतू या झालेल्या पावसामुळे अजून जमिनीची तहानही भागलेली नाही. त्यामुळे दरवर्षी या वेळेत २५ ते ३० टक्के साठा होणारे पाझर तलाव, धरणे अजूनही कोरडेच आहेत.

त्यामुळे मागील काही महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करणारी वाळूज महानगरातील अनेक गावे पावसाळ्यातही तहानलेलीच आहेत. महानगरातील सिडको वाळूज महानगरासह पंढरपूर, वडगाव कोल्हाटी, तीसगाव, साजापूर, रांजणगाव, वाळूज, जोगेश्वरी, कमळापूर, विटावा, घाणेगाव आदी गावांतील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून यातील काही गावांना स्थानिक प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एमआयडीसीने पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्यात कपात केली आहे. या पाणी कपातीच्या धोरणामुळे स्थानिक ग्रामपंचायतीही संकटात सापडल्या असून, गावाला पाणीपुरवठा करताना त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. यातून बहुतांशी ग्रामपंचायतीला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.


तर भीषण पाणीटंचाई
अर्धा पावसाळा संपत आला आहे. परंतू अजून चांगला पाणीसाठा होईल असा मोठा पाऊस झालेला नाही. दरवर्षी पावसाळ्यात सुरुवातीच्या एक ते दीड महिन्यात पाझर तलाव, धरणे, नाल्यात बºयापैकी साठा होतो. पण यावर्षी एकाही तलावात, धरणा पाणी साठा झालेला नाही. यंदा जमिनीतील पाणीपातळीही मोठ्या प्रमाणात खाली गेली आहे. जर काही दिवसांत मोठा पाऊस झाला नाही. तर नागरिकांसह जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
----------------------------------------------

Web Title: During the rainy season many villages thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.