केबल जळाल्याने ९ तास वीज पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:19 PM2019-05-21T23:19:42+5:302019-05-21T23:20:01+5:30

वाळूज उद्योनगरीतील सीएट फिडरवरील केबल जळाल्याने मंगळवारी पहाटे ३ वाजेपासून अर्ध्या वाळूज महानगरातील वीज गूल झाली होती.

Due to cable burning, 9 hours of power supply was stopped | केबल जळाल्याने ९ तास वीज पुरवठा बंद

केबल जळाल्याने ९ तास वीज पुरवठा बंद

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूज उद्योनगरीतील सीएट फिडरवरील केबल जळाल्याने मंगळवारी पहाटे ३ वाजेपासून अर्ध्या वाळूज महानगरातील वीज गूल झाली होती. महावितरणकडून जागी नवीन केबल टाकण्यात आल्यानंतर दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास वीज पुरवठा पूर्ववत झाला.


वाळूज सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या रांजणगाव, वाळूज, जोगेश्वरी, घाणेगाव, कमळापूर,नारायणपूर आदी गावांत महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येतो. मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास अचानक वीज पुरवठा बंद झाला होता. एक तास उलटुन गेल्यानंतरही वीज पुरवठा सुरु न झाल्याने नागरिकांनी महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. तांत्रिक बिघाड झाला असून, लवकरच वीज पुरवठा पूर्ववत होईल, असे अभियंत्यांनी सांगितले.

दरम्यान, वीज पुरवठा खंडीत झाल्याने प्रचंड उकाड्यामुळे अनेकांनी गच्ची व अंगणात आश्रय घेतला होता. महावितरणच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यालगतच्या सीएट फिडरवरील केबल जळाल्याचे अभियंते व कर्मचाºयांच्या लक्षात आले. त्यानंतर ही केबल बदलण्यासाठी शहरी भागातील वीज पुरवठा बंद ठेवण्याची परवानगी घेण्यात बराच वेळ गेला. बºयाच वेळानंतर जळालेली केबल बदलण्यात आली. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास परिसरातील वीज पुरवठा पुर्ववत झाला.


रोजेदारांची झाली गैरसोय
वाळूज, रांजणगाव, जोगेश्वरी, नारायणपूर, कमळापूर आदी गावांतील वीज पुरवठा मंगळवारी पहाटे ३ वाजेपासून खंडीत झाला होता. सध्या रमजान महिना सुरु असून, सहेरीची तयारी सुरु असतानाच वीज पुरवठा खंडीत झाल्याने रोजेदार बांधवांची गैरसोय झाली. अनेकांना बॅटरी व मोबाईल टॉर्चच्या सहाय्याने सहेरीची तयारी करावी लागली. किमान रजमान महिन्यात तरी विज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी शेख अल्ताफ, नदीम झुंबरवाला, फैयाज कुरेशी, शेख अरशद, बबलू पठाण आदींनी केली आहे.

Web Title: Due to cable burning, 9 hours of power supply was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.