Drought In Marathwada : मराठवाड्यातील १६ लाख नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 07:40 PM2018-12-19T19:40:26+5:302018-12-19T19:44:09+5:30

७०५ टँकर पाच जिल्ह्यांत सध्या सुरू असून, भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

Drought in Marathwada: Thirty lakh people of Marathwada depend upon water tanker | Drought In Marathwada : मराठवाड्यातील १६ लाख नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर

Drought In Marathwada : मराठवाड्यातील १६ लाख नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळ गंभीर वळणावर पोहोचू लागला आहे. पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट सध्या विभागासमोर असून, १६ लाख २२ हजार २७६ नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. ७०५ टँकर पाच जिल्ह्यांत सध्या सुरू असून, भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ३६४ गावांतील ७ लाख १०० नागरिक, जालन्यातील ६३ गावांतील १ लाख ५८ हजार ७०६ नागरिक, नांदेडमधील १ गावातील १२६०० नागरिक, बीड जिल्ह्यातील १३४ गावांतील ६ लाख ९९ हजार ११८ नागरिक, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ६ गावांत राहणाऱ्या ११ हजार ७५२ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत ३७ गावांची वाढ झाली आहे. तसेच ५ लाख नागरिकांपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. ५६८ गावे आणि ६७ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून, आगामी काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठ्यासाठी विभागातील ५७८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

कोणत्या जिल्ह्यात किती टँकर :
जिल्हा                  लोकसंख्या           गावे    टँकर संख्या 

औरंगाबाद         ७ लाख ४० हजार     ३६४    ४६३
जालना              १ लाख ५८ हजार    ६३    ९५
नांदेड                     १२ हजार ६००    ०१    ०२
बीड                    ६ लाख ९९ हजार    १३४    १३९
उस्मानाबाद            ११ हजार ७५२    ०६    ०६
एकूण                १६ लाख २२ हजार     ५६८    ७०५

Web Title: Drought in Marathwada: Thirty lakh people of Marathwada depend upon water tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.