डॉक्टरांनी वाचविले दोघींचे पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:08 AM2018-03-19T01:08:36+5:302018-03-19T01:08:40+5:30

दुर्मिळ अशा गुडघ्यातील कर्करोगाने त्रस्त दोन युवतींचे पाय खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी कापावे लागणार असल्याचे सांगितले; परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातील डॉक्टरांनी हाडांच्या कर्करोगाची अतिशय दुर्मिळ आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून दोघींचे पाय वाचविले.

The doctor saved legs of 2 young ladies | डॉक्टरांनी वाचविले दोघींचे पाय

डॉक्टरांनी वाचविले दोघींचे पाय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दुर्मिळ अशा गुडघ्यातील कर्करोगाने त्रस्त दोन युवतींचे पाय खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी कापावे लागणार असल्याचे सांगितले; परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातील डॉक्टरांनी हाडांच्या कर्करोगाची अतिशय दुर्मिळ आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून दोघींचे पाय वाचविले.
उषा वधेकर (२५, रा. आष्टी, जि. बीड) आणि शिवकन्या शिरसाले (२३, रा. निलंगा, जि. लातूर) या दोघींवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या दोघींच्या एका पायाच्या गुडघ्याला सूज आली होती. त्यामुळे असह्य वेदनेने त्या त्रस्त होत्या. तपासणीनंतर गुडघ्यातील कर्करोगाचे निदान
झाले.
यावरील उपचारासाठी खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दोघींना गुडघ्यापासून पाय काढण्याचे सांगून शस्त्रक्रियेचा खर्च २ ते ३ लाख रुपये सांगितला. दोघींची परिस्थिती हालाखीची होती. या रुग्णांना घाटीतील डॉक्टरांची माहिती मिळाली आणि त्या उपचारासाठी अस्थिव्यंगोपचार विभागात दाखल झाल्या. विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत थोरात यांनी बायोप्सीद्वारे कर्करोगाचे निदान केले.
दोघींना पाय वाचविण्याची शास्वती देऊन त्यावरील गुंतागुतीच्या शस्त्रक्रियेविषयी सखोल माहिती
दिली.
दोन्ही रुग्णांनी सहमती देताच शस्त्रक्रिया करण्यात आली. अशा शस्त्रक्रियांसाठी मुंबई, पुणे येथे जाण्याची वेळ रुग्णांवर येते; परंतु घाटीतही ही शस्त्रक्रिया होत असल्याने रुग्णांची गैरसोय टाळून आर्थिक खर्च वाचविता येत असल्याचे या दोन्ही शस्त्रक्रियांवरून स्पष्ट झाले.
शस्त्रक्रि येसाठी डॉ. चंद्रकांत थोरात यांच्यासह डॉ. एन. के. कपाडिया, डॉ. मुक्तदीर अन्सारी, डॉ. रमाकांत भिवसन, डॉ. उमाकांत करमळकर, डॉ. अभिजित मोरे, डॉ. उमेश काकडे, बधिरीकरणशास्त्र विभागातील डॉ. राजश्री विरशिद (सोनवणे), डॉ. सुचिता जोशी, डॉ. संतोष, इन्चार्ज सिस्टर माधुरी कुलकर्णी, शोभा साळवे यांच्यासह ब्रदर्स, सिस्टर्सनी परिश्रम घेतले. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: The doctor saved legs of 2 young ladies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.