निराधाराला डॉक्टरांनी दिला मदतीचा हात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 10:59 PM2019-07-01T22:59:51+5:302019-07-01T23:00:01+5:30

सिडको उड्डाणपूलाखाली गेल्या दोन महिन्यांपासून असलेल्या निराधार व्यक्तीला मदतीचा हात देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने ‘डॉक्टर डे’ साजरा केला.

The doctor gave his help | निराधाराला डॉक्टरांनी दिला मदतीचा हात 

निराधाराला डॉक्टरांनी दिला मदतीचा हात 

googlenewsNext

औरंगाबाद : सिडको उड्डाणपूलाखाली गेल्या दोन महिन्यांपासून असलेल्या निराधार व्यक्तीला शहरातील डॉ. फारूक पटेल, डॉ. सुनील पगडे, डॉ. मनोज माळी, रोहित रत्नपारखे, जमीर खान यांनी मदतीचा हात देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने ‘डॉक्टर डे’ साजरा केला.


या निराधार व्यक्तीला अर्धांगवायू झाल्याचे समोर आले. निराधार व्यक्तीविषयी माहिती मिळाल्यानतर सिडको उड्डाणपूल चौक गाठून डॉक्टरांनी या व्यक्तीला अंघोळ घातली. त्याला नवीन कपडे दिले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. घाटी रुग्णालयाच्या परिसरातील शेडमध्ये वर्षानुवर्षे बेवारस ठाण मांडलेले दिसून येतात.

काही बेवारस वृद्ध, अपंग, आजारी आहेत. काहींना त्यांच्या मुलांनीच सोडलेले आहे. तर काहींना रुग्णवाहिकांसह इतरांनी आणून सोडलेले असते, तर काहींचे कुणीच नाही म्हणून त्यांनी घाटीचा आसरा घेतलेला आहे. त्यांनाही मदतीचा हात मिळण्याची गरज आहे. 

Web Title: The doctor gave his help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.