१६ आॅक्टोबरपासून शाळांना दिवाळीच्या सुट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:42 AM2017-10-06T00:42:38+5:302017-10-06T00:42:38+5:30

दिवाळी सणानिमित्त शाळांना १६ आॅक्टबरपासून सुट्यां जाहिर करण्यात आल्या आहेत. शाळेच्या सुट्यांचे नियोजन करण्यात आले असून याबाबत संबधित तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकाºयांना कळविण्यात आले आहे. जिल्ह्यातील जि. प. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अनुदानित, विनाअनुदानित व सैनिकी शाळांना सुट्यां लागू असणार आहेत.

Diwali holidays from October to schools | १६ आॅक्टोबरपासून शाळांना दिवाळीच्या सुट्या

१६ आॅक्टोबरपासून शाळांना दिवाळीच्या सुट्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दिवाळी सणानिमित्त शाळांना १६ आॅक्टबरपासून सुट्यां जाहिर करण्यात आल्या आहेत. शाळेच्या सुट्यांचे नियोजन करण्यात आले असून याबाबत संबधित तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकाºयांना कळविण्यात आले आहे. जिल्ह्यातील जि. प. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अनुदानित, विनाअनुदानित व सैनिकी शाळांना सुट्यां लागू असणार आहेत.
दिवाळी सण जवळ आला की सर्वांचीच लगबग सुरू होते. विद्यार्थ्यांचेही शाळांना सुट्या कधी लागतील याकडे लक्ष असते. शासनाकडून १६ आॅक्टोबरपासून सर्व शाळांना सुट्या जाहिर करण्यात आल्या असून ६ नोव्हेंबरला शाळा उघडणार आहे. यंदा शाळांना दिवाळीची सुट्टी १६ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान जाहीर करण्यात आली. परंतु ४ नोव्हेंबर रोजी गुरूनानक जयंती व ५ नोव्हेंबर रोजी रविवार असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा ६ नोव्हेंबरला उघडणार आहेत. त्यामुळे यंदा शाळांच्या सुट्ट्यांत दोन दिवसांची भर पडली आहे. विद्यार्थ्यांनाही याचा आनंद घेता येणार आहे. शाळा उघडल्यानंतरच संकलीत चाचणी क्रमांक १ घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे एल. टी. लोंढे यांनी सांगितले. याबाबत मात्र शासनाकडून नियोजनाचे वेळापत्रक प्राप्त झाले नाही. पत्र मिळताच पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.

Web Title: Diwali holidays from October to schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.