जि. प. शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:40 PM2019-02-02T23:40:41+5:302019-02-02T23:40:48+5:30

जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक आलेख उंचावत असताना शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात येत नाहीत. शिक्षण विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेनेशनिवारी दुपारी जि.प.समोर ढोलकी बजाव आंदोलन केले.

District Par. Fix Teacher's Pending Problems | जि. प. शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवा

जि. प. शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवा

googlenewsNext
ठळक मुद्देमागणी : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे ढोलकी बजाव आंदोलन

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक आलेख उंचावत असताना शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात येत नाहीत. शिक्षण विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेनेशनिवारी दुपारी जि.प.समोर ढोलकी बजाव आंदोलन केले.
जि.प.चा शिक्षण विभाग, प्रशासन जाणीवपूर्वक शिक्षकांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. या समस्या सोडविण्यात जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणीही संघटनेने दिलेल्या निवेदनाद्वारे केली. दिवाळीत १ तारखेला वेतन करण्यात आले. त्यानंतर सातत्याने वेतनाबाबत उशीर करण्यात येत आहे. शिक्षण समितीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एक महिना उलटूनही विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, पदवीधर पदोन्नती करण्यात प्रशासन टाळाटाळ करीत आहे. रॅण्डम राऊंडमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांचे रखडलेले समायोजन तात्काळ करावे, जिल्हांतर्गत बदल्यांमधील स्तनदा व गरोदर मातांना पदस्थापना देताना केलेल्या अन्यायाची चौकशी करावी, महिला शिक्षकांना शिक्षणाधिकाºयांकडून होणाºया असभ्य वर्तनाची चौकशी करावी, बालसंगोपन रजा मंजुरीचे अधिकार गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे वर्ग करावेत, शासन निर्णयाचे उल्लंघन करून केलेल्या समायोजनाची चौकशी, वैद्यकीय प्रतिपूर्ती मंजुरीचे अधिकार जिल्हा आरोग्य अधिकाºयांकडे द्यावेत, जि. प. शाळांना जीएसटी नोंदणीतून वगळावे, शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धा भरवून त्याचा खर्च राखीव निधीतून करावा, प्राथमिकमधून माध्यमिकमध्ये पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांना एक वेतनवाढ तात्काळ द्यावी, अशा विविध मागण्यांचा समावेश निवेदनात होता. मागण्यांचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांना देण्यात आले. आंदोलनस्थळी माजी जि. प. अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, बांधकाम व अर्थ विभागाचे सभापती विलास भुमरे, शिक्षण सभापती मीना शेळके, समाजकल्याण सभापती धनराज बेडवाल, महिला व बालकल्याण सभापती कुसुम लोहकरे आणि प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल आदींनी भेट दिली. आंदोलनात जिल्हा संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, जिल्हाध्यक्ष दीपक पवार, संतोष आढाव, लक्ष्मण ठुबे, सदानंद माडेवार, कल्याण पवार, अनिल काळे, श्शिकांत बडगुजर, गोपाल फिरके, महेश लबडे, मनोहर गावडे, व्ही. एम. पाटील, भगवान हिवाळे, शशिकांत सावंत, चंद्रकांत निकम, सोमनाथ जगदाळे, सचिन पोलास, अरविंद आडे, अमोल एरंडे या पदाधिकाºयांसह मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते.
चौकट
ढोलकी वाजवून प्रशासनाचा निषेध
शिक्षकांच्या मागण्या प्रलंबित ठेवणाºया जि. प. प्रशासनाचा ढोलकीच्या तालावर घोषणाबाजी करून शिक्षक सेनेतर्फे निषेध करण्यात आला. यावेळी शिक्षकांनी ढोलकी वाजवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.
 

Web Title: District Par. Fix Teacher's Pending Problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.