दुचाकीस्वार मंगळसूत्र चोरट्यांची शहरात धूम, ३ महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:12 PM2019-04-24T23:12:21+5:302019-04-24T23:12:48+5:30

लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त संपल्यामुळे रस्त्यावरील पोलीस हटल्याचे हेरून दुचाकीस्वार चोरट्यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात ३ पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढला. बुधवारी सकाळी ६.३० ते ७.१५ वाजेच्या दरम्यान घडलेल्या ३ घटनांनी पोलीस यंत्रणेला जागे केले. विशेष म्हणजे दुचाकीस्वार चोरटे विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले.

Dhok, 3 women's son-in-law, dumped in twin-wheelers in Maungsutra thieves | दुचाकीस्वार मंगळसूत्र चोरट्यांची शहरात धूम, ३ महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावल्या

दुचाकीस्वार मंगळसूत्र चोरट्यांची शहरात धूम, ३ महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावल्या

googlenewsNext
ठळक मुद्देवृद्ध महिला चोरट्यांचे लक्ष्य : बीड बायपास, सेव्हन हिल आणि सिडकोत घडल्या घटना



औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त संपल्यामुळे रस्त्यावरील पोलीस हटल्याचे हेरून दुचाकीस्वार चोरट्यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात ३ पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढला. बुधवारी सकाळी ६.३० ते ७.१५ वाजेच्या दरम्यान घडलेल्या ३ घटनांनी पोलीस यंत्रणेला जागे केले. विशेष म्हणजे दुचाकीस्वार चोरटे विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले.
पहिली घटना
बीड बायपास परिसरातील गोपीकिसन रामकिसन राठी यांच्या आई वत्सलाबाई (वय ८०) या बुधवारी सकाळी ६.३० वाजता झोपेतून उठल्या. त्या घराच्या अंगणात तोंड धूत होत्या. तेव्हा लाल रंगाच्या मोटारसायकलवरून दोन जण आले. दुचाकीवरील एक जण खाली उतरला आणि राठी यांच्या घराशेजारील किराणा दुकानात गेला. त्याने पाण्याची बाटली विकत घेतली. पाणी पिले. तोपर्यंत दुचाकीस्वार त्याची मोटारसायकल पुढे जाऊन वळवून आला. त्याच्या साथीदाराने आणखी एक पाण्याची बाटली मागितली. याचवेळी त्या चोरट्याने वत्सलाबाई यांच्या पाठीला स्पर्श केला. वत्सलाबाई मागे वळून पाहत असतानाच एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची सोनसाखळी हिसका देत तोडली आणि तो साथीदारासह मोटारसायकलवर बसून निघून गेला. वत्सलाबाई यांनी चोर, चोर म्हणून आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोरटे वेगाने तेथून पळून गेले. या घटनेप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
घटना दुसरी
दुसरी घटना जळगाव रोडलगतच्या सर्व्हिस रोडवरील विजयश्री कॉलनीच्या कॉर्नरवर सकाळी ७.१० वाजेच्या सुमारास घडली. बायपासवर वृद्धेची सोनसाखळी हिसकावल्यानंतर चोरट्यांनी जळगाव रस्त्यालगतच्या सर्व्हिस रोडने पायी जाणाºया ७२ वर्षीय पुष्पावती गोपालराव गंटा (रा. सत्यमनगर, सिडको एन-५) यांना गाठले. पुष्पावती सर्व्हिस रोडने एकट्याच जात होत्या. त्या विजयश्री कॉलनी कॉर्नरवर असताना लाल रंगाच्या दुचाकीने आलेले दोन चोरटे अचानक मागून आले आणि त्यांच्याजवळ येऊन थांबले. दुचाकीवर मागे बसलेल्या एका चोरट्याने पुष्पावती यांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्रास हिसका दिला. प्रसंगावधान राखून पुष्पावती यांनी सोनसाखळी पकडली. त्यामुळे माळेतील दोन वाट्या त्यांच्या हातात राहिल्या आणि चोरटे दोन पदरी सोनसाखळी घेऊन सुसाट निघून गेले. पुष्पावती यांनी चोर, चोर म्हणून मदतीसाठी आरडाओरड केली, तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी पुष्पावती यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

Web Title: Dhok, 3 women's son-in-law, dumped in twin-wheelers in Maungsutra thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.