सुसाट ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 10:13 PM2019-01-27T22:13:03+5:302019-01-27T22:13:15+5:30

सिग्नलचा लाल दिवा लागल्यामुळे थांबलेल्या दुचाकीस्वार चुलती पुतण्याला मागून सुसाट आलेल्या सिमेंट मिक्सर ट्रकने जोराची धडक दिली. यात मोटारसायकलस्वार महिला ट्रक च्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाली.

Death of a succulent truck dies | सुसाट ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

सुसाट ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

googlenewsNext

औरंगाबाद : सिग्नलचा लाल दिवा लागल्यामुळे थांबलेल्या दुचाकीस्वार चुलती पुतण्याला मागून सुसाट आलेल्या सिमेंट मिक्सर ट्रकने जोराची धडक दिली. यात मोटारसायकलस्वार महिला ट्रक च्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाली. या घटनेत मृताच्या मुलीसह पुतण्या बचावला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक करून काचा फोडल्या. ही घटना टीव्हीसेंटर चौकात रविवारी (दि. २७) दुपारी २.२० वाजेच्या सुमारास घडली. राजश्री विलास खुर्डे (४१ रा़ राधास्वामी कॉलनी, जटवाडारोड) असे मृत महिलेचे नाव आहे.


जटवाडा परिसरातील राधास्वॉमी कॉलनीतील रहिवासी राजश्री विलास खुर्डे या रविवारी दुपारी आजारी मुलीला घेऊन टि.व्ही. सेंटर परिसरातील खाजगी रुग्णालयात आल्या होत्या. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर पुतण्या सुनील याच्या दुचाकीवर बसून रुग्णालयातून राधास्वॉमी कॉलनीतील घरी जात होत्या. टीव्हीसेंटर चौकात सिग्नलवर लाल दिवा लागल्याने सुनील यांनी दुचाकी उभी केली. त्याचवेळी त्यांच्या मागून सुसाट आलेल्या सिमेंट मिक्सर ट्रकने (एमएच २०एटी ५१५३) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली़

या अपघातात राजश्री यांची मुलगी आणि पुतण्या दुचाकीसह रस्त्याच्या एका बाजूला फेकले गेले आणि राजश्री या ट्रकच्या चाकाखाली आल्या़ घटनेनंतर ट्रकचालक ट्रक सोडून तेथून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी राजश्री यांना तातडीने घाटी रुग्णालयात हलविले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सिडको ठाण्यात सुनील यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मुनीर दगडू शहा (वय ३५,रा. निरगुडी, ता. खुलताबाद)याच्याविरोधात गुन्हा नोंदविला. 

Web Title: Death of a succulent truck dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.