शेद्रा एमआयडीसी परिसरात बेवारस कारमध्ये आढळला मृतदेह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 02:14 PM2019-02-11T14:14:09+5:302019-02-11T14:14:55+5:30

मुकुंदवाडी येथील प्रकाश कडुबा कासारे (४८ ) असे मृताचे नाव असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Dead body found in car at Shendra MIDC area | शेद्रा एमआयडीसी परिसरात बेवारस कारमध्ये आढळला मृतदेह 

शेद्रा एमआयडीसी परिसरात बेवारस कारमध्ये आढळला मृतदेह 

googlenewsNext

औरंगाबाद : शेंद्रा एमआयडीसीत मुख्य रस्त्यावरील एका कंपनी समोर उभ्या असलेल्या बेवारस कारमध्ये  एका 48 वर्षीय इसमाचा मृतदेह आस्ज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास आढळून आला. मुकुंदवाडी येथील प्रकाश कडुबा कासारे (४८ ) असे मृताचे नाव असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

दरम्यान, मृत कासारे हे मुकुंदवाडी येथील रहिवासी असून मृतदेहावर कुठल्याही जखमा आढळून आल्या नसल्याची माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पी.आय. सत्यजित ताईतवाले यांनी दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 

Web Title: Dead body found in car at Shendra MIDC area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.