दगडफेक करणा-यांविरु द्ध गंभीर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:36 AM2018-01-04T00:36:35+5:302018-01-04T00:36:40+5:30

पोलीस, एस.टी. महामंडळाची वाहने आणि नागरिकांच्या वाहनांवर दगडफेक करून त्यांना जखमी करणा-या दंगेखोरांविरोधात खुनाचा प्रयत्न करणे (भादंवि ३०७), दंगल घडविणे (कलम १४३,१४७, १४८, १४९), मारहाण करणे (कलम ३२४), सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तांचे नुकसान करणे (कलम ३३६ आणि ४२७), पोलीस आयुक्तांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे (कलम १३५) यासह अन्य कलमांखाली विविध पोलीस ठाण्यांत १८ गुन्हे नोंदविण्यात आले.

 Criminal crime against stone makers | दगडफेक करणा-यांविरु द्ध गंभीर गुन्हे

दगडफेक करणा-यांविरु द्ध गंभीर गुन्हे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पोलीस, एस.टी. महामंडळाची वाहने आणि नागरिकांच्या वाहनांवर दगडफेक करून त्यांना जखमी करणा-या दंगेखोरांविरोधात खुनाचा प्रयत्न करणे (भादंवि ३०७), दंगल घडविणे (कलम १४३,१४७, १४८, १४९), मारहाण करणे (कलम ३२४), सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तांचे नुकसान करणे (कलम ३३६ आणि ४२७), पोलीस आयुक्तांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे (कलम १३५) यासह अन्य कलमांखाली विविध पोलीस ठाण्यांत १८ गुन्हे नोंदविण्यात आले.
भीमा-कोरेगाव येथील घटनेची माहिती समजल्यानंतर सोमवारी दुपारपासून शहरातील विविध भागात एस.टी. महामंडळाच्या बसेस, खाजगी वाहने,मालवाहू ट्रका आणि रिक्षा, दुचाकींची ठिकठिकाणी तोडफोड करण्यात आली. यावेळी दगडफेकीत अनेक पोलीस आणि सामान्य नागरिक जखमी झाले. सोमवार रात्री १२ ते मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत विविध पोलीस ठाण्यांत १८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. जिन्सी पोलीस ठाण्यात सुनील छाजेड आणि सुमतीलाल गुगळे या व्यापाºयांनी दिलेल्या तक्रारीवरून वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले. छाजेड यांच्या दुकानावर दगडफेक करण्यात आली आणि जालना रोडवरील सुमारे आठ कारच्या काचा फोडण्यात आल्या होत्या, तर सुमती यांच्या कारवर १० ते १२ जणांनी लाठ्या, काठ्या आणि दगडाने हल्ला चढवून नुकसान केले. मुकुंदवाडी ठाण्यांतर्गत एस.टी. बसचालक राहुल सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून बस फोडणाºयांविरोधात गुन्हा नोंद झाला. जवाहरनगर ठाण्यात वसंत पाटील (रा. शिवशंकर कॉलनी) यांच्या तक्रारीवरून आरोपी राजू आव्हाड, शेखर साळवे आणि राहुल दाभाडे विरोधात वाहनांचे नुकसान केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला, तर सूर्यकांत मुंढे यांच्या तक्रारीवरून कार फोडल्याप्रकरणी मुकेश पटेल आणि अन्य एका विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. सुनील देवरे यांच्या तक्रारीवरून क्रांतीचौक ठाण्यात ५० ते ६० जणांच्या जमावाविरोधात तर अनिल खंडाळकर यांच्या कारवर हल्ला करून त्यांच्या कुटुंबियांना जखमी करणाºया ५० ते ६० जणांविरोधात तक्रार नोंदविण्यात आली.
मिलकॉर्नर येथे बस फोडणाºया २० ते ३० जणांविरोधात चालक विठ्ठल कोळी यांनी तक्रार नोंदविली. २ रोजी लक्ष्मण चावडी रोडवर उभी कार जाळणाºया तीन अनोळखी तरुणांविरोधात कारमालक सुदर्शन लाळे यांनी क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. टी.व्ही.सेंटर परिसरातील सिद्धार्थनगर रोडवर पोलिसांवर दगडफेक करून वाहनांना क्षती पोहोचविल्याप्रकरणी संतोष साळवे आणि अन्य दोन ते तीन हजार जमावाविरोधात सिडको ठाण्यात पो.नि.कैलास प्रजापती यांनी गुन्हा नोंदविला. एस.टी.चालक शंकर अंभोरे, विलास खरमुटे यांच्या तक्रारीवरून सिटीचौक ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे नोंद झाले.
सुमारे अडीच ते तीन हजार जणांविरोेधात दंगलीचे गुन्हे
शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. पी. बारपांडे यांच्या कारची तोडफोड करणाºया जमावाविरोधात त्यांनी सिटीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. २ रोजी दुपारी सांस्कृतिक मंडळाच्या रोडवर ही घटना घडली होती.
जांभाळा गावाजवळ १ रोजी रात्री बसवर झालेल्या दगडफेकप्रकरणी चालक शंकर रेणू चव्हाण यांच्या तक्रारीवरून ३ ते ४ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यातील जमादार शिवाजी उगले यांच्यासह विशेष पोलीस अधिकाºयांवर न्यायनगर येथे दगडफेक केल्याप्रकरणी ८ ते १० जणांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दंगल घडविणे आणि अन्य कलमांसह गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
पोलीस कर्मचारी विजय पोळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पीरबाजार ते क्रांतीचौक दरम्यान मोर्चा काढून कापड दुकानावर दगडफेक केल्याप्रकरणी पंकज बोर्डे, बुद्धभूषण निकाळजे, राजू हिवराळे यांच्याविरोधात उस्मानपुरा येथे गुन्हा नोंदविण्यात आला. अन्य एक गुन्हा पोलीस उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांच्या तक्रारीवरून १५ ते २० जणांविरोधात दाखल झाला. यात नारायण साळवे, आनंद दाभाडे, शुभम मगरे, विशाल खरात, राजू गायकवाड, अजय म्हस्के आणि अन्य लोकांचा समावेश आहे.

Web Title:  Criminal crime against stone makers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.