देगलूर बाजार समिती प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीवरुन वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:00 AM2017-08-17T00:00:24+5:302017-08-17T00:00:24+5:30

देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीवरुन मोठे वादंग निर्माण झाले असून या प्रशासकीय मंडळात शिवसेनेच्या एकाही कार्यकर्त्याचा समावेश नसल्याचा गौप्यस्फोट आ़सुभाष साबणे यांनी केला आहे. तर भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हाध्यक्षांची भेट घेऊन आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

The controversy over appointment of Deglur bazar committee | देगलूर बाजार समिती प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीवरुन वादंग

देगलूर बाजार समिती प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीवरुन वादंग

googlenewsNext

श्रीधर दीक्षित ।
लोकमत न्यूज नेटवर्क
देगलूर : देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीवरुन मोठे वादंग निर्माण झाले असून या प्रशासकीय मंडळात शिवसेनेच्या एकाही कार्यकर्त्याचा समावेश नसल्याचा गौप्यस्फोट आ़सुभाष साबणे यांनी केला आहे. तर भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हाध्यक्षांची भेट घेऊन आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव पाटील सुगावकर यांना भास्करराव पाटील खतगावकर यांनी नांदेड येथे भाजपात प्रवेश दिला़ त्याचवेळी सुगावकर यांना बाजार समितीचे सभापतीपद देण्याचा शब्द देण्यात आला होता. माधवराव पाटील सुगावकर यांच्या पक्षप्रवेशाची कल्पनासुद्धा भाजपाच्या तालुक्यातील कोणत्याही पदाधिकाºयांना देण्यात आली नव्हती़ त्यामुळे कार्यकर्त्यांत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. भाजपात कुणीही येवो त्याचे आम्ही स्वागत करतो मात्र पक्षप्रवेश करताना त्याची थोडीफार माहिती तालुक्यातील पदाधिकाºयांना देण्यात येणे जरुरीचे होते, असे भाजपाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. त्यात आता प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीवरुन भाजपा कार्यकर्त्यांत ठिणगी पडली आहे. बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळात बहुतांश जण राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षात राहिलेले व जिल्हा परिषद निवडणूक काळात भाजपाच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार केलेल्यांचा काही जणांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मधुकर नारलावार यांचे पुत्र संतोष नारलावार यांचा संचालक मंडळात समावेश असून हा समावेश कुणाच्या शिफारशीनुसार व कोणत्या पक्षाकडून करण्यात आला, हे भाजपा- शिवसेना कार्यकर्त्यांना समजणे अवघड झाले आहे.
या नियुक्तीवरुन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेवर खापर फोडले आहे. एवढेच नव्हे, तर सभापती म्हणून नियुक्ती झालेले आत्माराम पाटील हे सुगावचे रहिवासी तर उपसभापती मोहित माधवराव पाटील व संचालक माधवराव पाटील हे पिता-पुत्र सुद्धा सुगावचेच रहिवासी आहेत. सुगाव येथील तिघांचा, देगलूर शहरातील तिघांचा व शेळगाव येथील दोघांचा समावेश आहे.
बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीवरुन भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांची रातोळी येथे भेट घेऊन आपला रोष व्यक्त केला. यावेळी जिल्हा सरचिटणीस गंगाधर जोशी यांचीही उपस्थिती होती. भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांची शासकीय समित्यांवर वर्णी लावण्यात येईल असे सांगितले.
नवनियुक्त प्रशासकीय मंडळ -आत्माराम दिगंबरराव पाटील -सभापती, मोहित माधवराव पाटील-उपसभापती, रंजित भाऊराव इंगोले, गंगाराम संग्राम गोपछडे, मोहन शंकरराव पाटील, श्रीनिवास राजाराम मंदिलवाड, संतोष मधुकर नारलावार, विजयालक्ष्मी हणमंतराव डोपेवाड, अनिता हणमंतरावरेड्डी लोकावार, माधवराव विठ्ठलराव पाटील, मंगलसिंग राजेंद्रसिंग देशमुख, जयपालरेड्डी निवृत्ती जामखेडे, बालासाहेब भरतराव देशमुख, हणमंत संग्राम देशमुख, शिवकुमार हणमंतराव देवाडे, इरवंतराव सोमन्ना तोनसुरे, लालू हरिबा कांबळे़

Web Title: The controversy over appointment of Deglur bazar committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.