काँग्रेस असो की राष्ट्रवादी; खैरेंचा पराभव अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:46 PM2018-12-13T23:46:51+5:302018-12-13T23:47:44+5:30

देशात नुकत्याच जाहीर झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला धक्का बसला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवार काँग्रेसचा असो की राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव अटळ असल्याचा दावा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला.

Congress or NCP; Khairn's defeat is inevitable | काँग्रेस असो की राष्ट्रवादी; खैरेंचा पराभव अटळ

काँग्रेस असो की राष्ट्रवादी; खैरेंचा पराभव अटळ

googlenewsNext
ठळक मुद्देसतीश चव्हाण यांचा दावा : लोकसभा निवडणुकीत जातीय, धार्मिक विद्वेष चालणार नाही

औरंगाबाद : देशात नुकत्याच जाहीर झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला धक्का बसला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवार काँग्रेसचा असो की राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव अटळ असल्याचा दावा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला.
विचारवंत आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवी गौरव समारंभाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आ. चव्हाण यांनी राजकीय प्रश्नांनाही उत्तरे दिली. ते म्हणाले, राज्यस्तरावर भाजप, शिवसेना आणि एमआयएम वगळून धर्मनिरपेक्षता मान्य असणाऱ्या पक्षांची महाआघाडी होणार आहे. यासाठीची बोलणी पक्षीय नेतृत्व स्तरावर सुरू आहे. शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे आतापर्यंत जातीय, धार्मिक विद्वेष पसरवून निवडणुका लढवत होते. यावेळी कोणत्याही प्रकारचा जातीय विद्वेष चालणार नाही. यामुळे आघाडीच्या बोलणीत औरंगाबादची जागा कोणालाही सुटली तरी त्याठिकाणी पुरोगामी विचारधारा असलेल्या पक्षाचाच उमेदवार विजयी होईल. नुकत्याच झालेल्या कन्हैयाकुमार यांच्या सभेला युवकांची मोठी गर्दी होती. या युवकांना बदल हवा असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. हा बदल युवकच घडवून आणतील. भाजप, शिवसेना आणि एमआयएम या एकाच नाण्याच्या बाजू असल्याचे तेलंगणा निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत एमआयएमची कोणतीही जादू चालणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करीत असलेले भारिप- बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे पुरोगामी पक्षांच्या महाआघाडीत स्वागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
काकासाहेब शिंदे यांच्या भावाला नोकरी
मराठा आरक्षणासाठी गोदावरी नदीपात्रात आत्महत्या करणाºया काकासाहेब शिंदे यांच्या भावाला शैक्षणिक पात्रतेनुसार कनिष्ठ लिपिकपदावर नोकरी देण्याचा निर्णय मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने घेतला होता. यास नोकरभरतीवर निर्बंध असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘खास बाब’ म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती आ. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. काकासाहेब शिंदे यांचा भाऊ अविनाश दत्तात्रय शिंदे यांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

Web Title: Congress or NCP; Khairn's defeat is inevitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.