युवक महोत्सवासाठी महाविद्यालयांची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:58 PM2017-08-16T23:58:58+5:302017-08-16T23:58:58+5:30

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आविष्कृत करणाºया विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाला आयोजक मिळत नसल्याने ‘कोणीतरी युवक महोत्सव घ्या हो’, अशी विनवणी करण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे़

College's Depression for Youth Festival | युवक महोत्सवासाठी महाविद्यालयांची उदासीनता

युवक महोत्सवासाठी महाविद्यालयांची उदासीनता

googlenewsNext

भारत दाढेल ल्ल नांदेड
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आविष्कृत करणाºया विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाला आयोजक मिळत नसल्याने ‘कोणीतरी युवक महोत्सव घ्या हो’, अशी विनवणी करण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे़ यावर्षी साडेतीनशे महाविद्यालयांपैकी केवळ दोनच प्रस्ताव आल्यानंतर विष्णूपुरी येथील ग्रामीण तंत्रनिकेतनला यजमानपद दिल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले़
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वार्षिक युवक महोत्सव यंदा २३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे़ नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या चार जिल्ह्यांतील महाविद्यालयीन युवकांसाठी हा महोत्सव पर्वणी ठरतो, परंतु मागील काही वर्षांपासून युवक महोत्सव घेण्यासाठी आयोजक मिळत नसल्याचे चित्र आहे़ त्यामुळे विद्यापीठाला नांदेड शहर व परिसरातील महाविद्यालयांना आयोजक करण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहे़ यावर्षी युवक महोत्सव घेण्यासाठी विद्यापीठाने महिनाभरापासून प्रयत्न चालविले आहेत़ महाविद्यालयांना स्मरणपत्र पाठविण्यात आले होते, परंतु महाविद्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही़ दरम्यान, मातोश्री प्रतिष्ठान व ग्रामीण तंत्रनिकेतन हे दोनच प्रस्ताव विद्यापीठाकडे प्राप्त झाले होते़ त्यापैकी मातोश्री प्रतिष्ठानने गतवर्षी युवक महोत्सवाचे यजमानपद भूषविले होते़ त्यामुळे विष्णूपुरीतील ग्रामीण तंत्रनिकेतन या संस्थेला आयोजक म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती आहे़ २३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत युवक महोत्सवाचे आयोजन केले असून विद्यापीठ महोत्सवाच्या तयारीला लागले आहे़
मागील काही वर्षांपासून युवक महोत्सवाला महाविद्यालयांचा प्रतिसाद मिळत नसल्याने स्पर्धकांची संख्याही कमी होत आहे़ दुसरीकडे विद्यापीठाकडून मिळणारे अनुदानही कमी असल्याने आयोजकांचा उत्साह मावळला आहे़

Web Title: College's Depression for Youth Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.