ट्रॉन्सपोर्ट चालकास मारहाण करुन कार्यालयाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 07:32 PM2019-01-31T19:32:51+5:302019-01-31T19:33:07+5:30

मालकाशी झालेल्या वादात मध्यस्थी केल्यावरुन साजापूर परिसरातील ट्रान्सपोर्ट चालकास तरुणाने बेदम मारहाण करुन कार्यालयाची तोडफोड केली.

The collapse of the office by assaulting the tracesport driver | ट्रॉन्सपोर्ट चालकास मारहाण करुन कार्यालयाची तोडफोड

ट्रॉन्सपोर्ट चालकास मारहाण करुन कार्यालयाची तोडफोड

googlenewsNext

वाळूज महानगर : मालकाशी झालेल्या वादात मध्यस्थी केल्यावरुन साजापूर परिसरातील ट्रान्सपोर्ट चालकास तरुणाने बेदम मारहाण करुन कार्यालयाची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली असून, तरुणाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दीपक सुखबिर सिंग (३४) याचे साजापूर परिसरात चंदीगड-पुना ट्रान्सपोर्ट या नावाचे दुकान आहे. ट्रॉन्सपोर्ट कार्यालयात मंगळवारी रात्री दीपक सिंग काम करीत असताना मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास त्याचा मित्र कुलदीप वर्मा याच्याकडे चालक म्हणून काम करणारा योगेश लघाने तेथे आला.

यावेळी योगेशने कुलदीप वर्मा व माझ्यात भांडण सुरु असताना मध्यस्थी का केली, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने चाकू चा धाक दाखवत सिंग याच्या खिशातील एक हजार रुपये काढुन घेत मारहाण केली. यानंतर त्याने ट्रान्सपोर्ट कार्यालयातील साहित्याची लाकडी दांड्याने तोडफोड केली.

दरम्यान, ट्रॉन्सपोर्ट व्यवसायिकांनी बुधवारी सकाळी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे गाठुन योगेश लघानेविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली. या प्रकरणी दीपक सिंग याच्या तक्रारीवरुन योगेश लघाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The collapse of the office by assaulting the tracesport driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.