पुन्हा सुरू होणार स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:29 AM2017-11-14T00:29:12+5:302017-11-14T00:29:17+5:30

येत्या ४ जानेवारी २0१८ पासून स्वच्छता सर्वेक्षण हा उपक्रम सुरू होणार असून यात चांगली कामगिरी बजावणाºया नगरपालिकांनाच यापुढे निधी मिळणार आहे.

Cleanliness will be restarted | पुन्हा सुरू होणार स्वच्छतेचा जागर

पुन्हा सुरू होणार स्वच्छतेचा जागर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येत्या ४ जानेवारी २0१८ पासून स्वच्छता सर्वेक्षण हा उपक्रम सुरू होणार असून यात चांगली कामगिरी बजावणाºया नगरपालिकांनाच यापुढे निधी मिळणार आहे. यात हिंगोली नगर परिषदेने स्वच्छतेच्या सर्व उपक्रमांची तयारी केली असून नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
हिंगोली नगरपालिकेने स्वच्छता अभियानात बाजी मारल्यानंतर आता या सर्वेक्षणासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत. यात आता तीन घटकांसह त्यातील उपघटकांसाठी पालिकेला काम करावे लागणार आहे. खºया अर्थाने शहर स्वच्छतेला यामुळे गती येणार आहे. यात सेवा स्तरासाठी १४00 गुण आहेत. यामध्ये कचरा संकलन व वाहतुकीसाठी ४00, कचरा प्रक्रिया व विल्हेवाटीसाठी ३५0, हागणदारीमुक्तीतील सातत्यासाठी ४२0, माहिती, शिक्षण व संवादाद्वारे जागृतीसाठी ७0 तर क्षमता बांधणीसाठी ७0 गुण आहेत. या घटकात प्रत्येक भागातून ओला व सुका कचरा वेगवेगळा उचलावा लागणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कुंड्या ठेवाव्या लागतील. पुरेसा कामगार वर्ग त्यांना आवश्यक सोयी-सुविधा, उचललेल्या कचºयापासून गांडूळखत, प्लास्टिक, लोखंड असल्यास त्याच्या पुनर्वापराचे नियोजन, शहरातील उपलब्ध शौचालये अद्ययावत ठेवणे, नागरिकांना जनजागृतीसाठी कार्यक्रम तसेच या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणारा एक कक्ष उभारून त्यातही मनुष्यबळ ठेवावे लागणार आहे.
प्रत्यक्ष निरीक्षण या घटकात १२00 गुण असून यात झोपडपट्टी, व्यापारी कचºयाचे नियोजन, गतवर्षीच्या तुलनेत आताची परिस्थिती तपासणे, मुख्य रस्ते, मुख्य सार्वजनिक ठिकाण, रेल्वे, बसस्थानक आदी ठिकाणच्या स्वच्छतेचा समावेश आहे. तर नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागाला १४00 गुण आहेत. यात नागरिकांच्या प्रतिक्रिया, सभा, उपलब्ध सुविधांची उपयोगिता, नव्या मागण्यांचा विचार केला जाणार आहे.

Web Title: Cleanliness will be restarted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.