शहराचा पाणीप्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:29 AM2017-08-21T00:29:37+5:302017-08-21T00:29:37+5:30

नांदेड शहराची तहान भागविणाºया विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रकल्पात ४५ दलघमीहून अधिक पाणी होते़ त्यामुळे नांदेडकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे़

The city's water question is gone | शहराचा पाणीप्रश्न मिटला

शहराचा पाणीप्रश्न मिटला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: नांदेड शहराची तहान भागविणाºया विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रकल्पात ४५ दलघमीहून अधिक पाणी होते़ त्यामुळे नांदेडकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे़
पावसाने ओढ दिल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पात केवळ अकरा दलघमी एवढा पाणीसाठा शिल्लक होता़ जिल्हाभरातील प्रकल्पांनीही तळ गाठला होता़ त्यामुळे आॅगस्टमध्येच हदगाव आणि हिमायतनगरमध्ये टँकर सुरु करण्यात आले होते़ त्याचप्रमाणेही शहरातही एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता़
दरम्यान, गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे नांदेडकरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात शुक्रवारी केवळ ११ दलघमी पाणी होते़ रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रकल्पात ४५ दलघमीपेक्षा अधिक पाणीसाठा झाला होता़ रात्री उशिरापर्यंत प्रकल्पात ८० दलघमीपर्यंत पाणी येईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता़ त्यामुळे प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे़

Web Title: The city's water question is gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.