शहर पोलीस अ, मसिआ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:46 AM2018-03-18T00:46:10+5:302018-03-18T00:46:39+5:30

एमजीएम क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंग औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत उच्च न्यायालय वकील संघाने इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्ट संघावर २ गडी राखून मात केली. अन्य लढतीत शहर पोलीस अ संघाने बजाज आॅटोवर आणि मसिआने युनायटेड ब्रेवरीजवर विजय मिळवला. शनिवारी झालेल्या लढतीत मधुर पटेल, संजय पाटील आणि मनोज शिंदे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.

City Police A, Masiya wins | शहर पोलीस अ, मसिआ विजयी

शहर पोलीस अ, मसिआ विजयी

googlenewsNext
ठळक मुद्देऔद्योगिक क्रिकेट स्पर्धा : मधुर पटेल, संजय पाटील, मनोज शिंदे सामनावीर

औरंगाबाद : एमजीएम क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंग औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत उच्च न्यायालय वकील संघाने इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्ट संघावर २ गडी राखून मात केली. अन्य लढतीत शहर पोलीस अ संघाने बजाज आॅटोवर आणि मसिआने युनायटेड ब्रेवरीजवर विजय मिळवला. शनिवारी झालेल्या लढतीत मधुर पटेल, संजय पाटील आणि मनोज शिंदे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.
आज झालेल्या पहिल्या सामन्यात इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टने २0 षटकांत सर्वबाद १३१ धावा केल्या. त्यांच्याकडून शुभम हरकळने २३ चेंडूंत ४ चौकार, २ षटकारांसह ३७, अमोल पवारने २९ चेंडूंत ३ चौकारांसह ३0 धावा केल्या. उच्च न्यायालय संघाकडून संदीप सहानी, सचिन जैस्वाल यांनी प्रत्येकी २ तर मनोज शिंदेने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात उच्च न्यायालय वकील संघाने विजयी लक्ष्य १९.३ षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात गाठले. त्यांच्याकडून मनोज शिंदेने २७ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह ३५ तर संदीप सहानी याने १९ चेंडूंत ३ चौकारांसह २१ धावांचे योगदान दिले. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेकतर्फे सुनील भालेने १0 धावांत ३ व अमोल खरातने २ गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात बजाज आॅटोचा संघ ६२ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून धर्मेंद्र मावी याने १४ व अली बाकोदाने ११ धावा केल्या. शहर पोलिसकडून शेख जिलानीने ११ धावांत ३, मोहमद इम्रान, आनंद गायके व संजय पाटील यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात शहर पोलिसने विजयी लक्ष्य ९ षटकात ४ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून शेख मुकीमने ३ चौकार व २ षटकारासह २८ व संजय पाटीलने ९ चेंडूंत २ चौकारांसह नाबाद १२ धावा केल्या. बजाज आॅटोकडून धर्मेंद्र महावीरने ८ धावांत ४ गडी बाद केले.
तिसºया सामन्यात ब्रेवरीजने ६ बाद १४५ धावा केल्या. त्यांच्याकडून पंकज फलकेने ४४ चेंडूंत ८ चौकारांसह ४, संदीप नागरेने २७, भास्कर जिवरगने २२ व स्वरूप बॅनर्जीने २१ धावा केल्या. मसिआकडून अतिक नाईकवाडेने २ तर मधुर पटेल, रोहन राठोड, केतन गोडबोले यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले. प्रत्युत्तरात मसिआने विजयी लक्ष्य ४ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून मधुर पटेलने ५८ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह नाबाद ८४ धावांची वादळी खेळी करीत निर्णायक कामगिरी केली. त्याने अतिक नाईकवाडेच्या साथीने नाबाद ५७ धावांची भागीदारीही केली. कर्णधार संदीप भंडारीने १४ धावांचे योगदान दिले. ब्रेवरीजकडून भास्कर जिवरग, संदीप गायकवाड यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. उद्या, रविवारी सकाळी ७.३0 वाजता एमजीएम वि. आयुर्विमा, सकाळी १0.३0 वा. बडवे इंजिनिअरिंग व एमआयटी रुग्णालय व १२ वाजता वैद्यकीय प्रतिनिधी व कंबाईन बँकर्स असे सामने खेळवले जाणार आहेत.

Web Title: City Police A, Masiya wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.