शहर पोलिसांनी गस्तीचा पॅटर्न बदलला; आता रात्रंदिवस असतात चाळीस पथके गस्तीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 06:37 PM2019-06-14T18:37:14+5:302019-06-14T18:39:40+5:30

घरफोड्या, वाहनचोरी आणि जबरी चोरी रोखण्यासाठी उचलले पाऊल

City police changed the round pattern; There are forty teams on field over day n night | शहर पोलिसांनी गस्तीचा पॅटर्न बदलला; आता रात्रंदिवस असतात चाळीस पथके गस्तीवर

शहर पोलिसांनी गस्तीचा पॅटर्न बदलला; आता रात्रंदिवस असतात चाळीस पथके गस्तीवर

googlenewsNext
ठळक मुद्देविनाकारण क्षेत्र सोडून जाणाऱ्या पथकावर कडक कारवाईचे संकेतछायाचित्रे आणि गुगल मॅपद्वारे पोजिशनची माहिती वरिष्ठांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर

औरंगाबाद : शहरातील वाहनचोरी, घरफोडी आणि मंगळसूत्र आणि पैशाच्या बॅगा पळविण्याच्या घटना रोखण्यासाठी शहर पोलिसांनी गस्तीचा पॅटर्न बदलला आहे. आतापर्यंत घडलेल्या गुन्ह्यांचा अभ्यास करून पोलिसांनी रात्रंदिवस रस्त्यावर पोलीस दिसावे, याकरिता तब्बल ४० पथकांद्वारे शहरात गस्त सुरू केली. रस्त्यावर पोलीस दिसत असल्याने उन्ह्याळ्याच्या सुटीतील घरफोड्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमालीची घट झाली.

शहरात काही महिन्यांपूर्वी मंगळसूत्र चोरी, पैशाच्या बॅगा पळविणे, जबरी चोरी आणि वाहनचोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. गतवर्षी आणि यावर्षी जानेवारीपासून झालेल्या घरफोड्या, वाहनचोऱ्या आणि जबरी चोरीच्या घटनेचे ठिकाण, वेळ याबाबतचा नकाशा तयार करून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी अभ्यास केला. तेव्हा सकाळी सहा ते साडेनऊपर्यंत आणि रात्री साडेआठ ते दहादरम्यान पोलिसांची शिफ्ट बदलण्याचा कालावधी असतो. या कालावधीत रस्त्यावर पोलीस नसतात, ही बाब गुन्हेगारांना चांगल्या प्रकारे माहिती असल्याने चोरटे या कालावधीत सक्रिय होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

रस्त्यावरील गुन्हे रोखण्यासाठी पो.नि. सावंत यांनी पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीचा पॅटर्न बदलून टाकला. नव्या पॅटर्ननुसार आता रात्र पाळीच्या पोलिसांची गस्त पहाटे पाच वाजता समाप्त होताच दुसऱ्या पथकाला पहाटे पाच ते सकाळी ११ या कालवधीसाठी गस्तीवर उतरविण्यात येते. यानंतर अन्य पथक ११ पासून ते रात्री नऊपर्यंत गस्तीवर असतात. रात्रपाळीची गस्त मध्यरात्री बारा ते पहाटे पाचपर्यंत असते. ही गस्त प्रभावी करण्यासाठी चाळीस पथके रस्त्यावर उतरविण्यात आले आहेत. यात पीसीआर मोबाईल कार आणि प्रत्येक ठाण्यातील वन मोबाईल, टू मोबाईल व्हॅनवरील कर्मचारी आणि बीट मार्शल यांच्या गस्तीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. विशेष म्हणजे पीसीआर मोबाईल व्हॅनवरील कर्मचाऱ्यांना पोलीस नियंत्रण कक्षाकडून जेव्हाही क ॉल केला जाईल तेव्हा ते त्यांना नेमून दिलेल्या परिसरातच गस्त करताना आढळणे आवश्यक आहे. विनाकारण क्षेत्र सोडून जाणाऱ्या पथकावर कडक कारवाईचे संकेतही वरिष्ठांनी दिले.

व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवावे लागते छायाचित्र
गुन्हे शाखेचे अधिकारी-कर्मचारी यांनी गस्तीत हलगर्जीपणा करू नये, याकरिता त्यांना ते करीत असलेल्या गस्तीवरील छायाचित्रे आणि गुगल मॅपद्वारे पोजिशनची माहिती वरिष्ठांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवावी लागते. गुरुवारी तब्बल १२० छायाचित्रे पो.नि. सावंत यांना गस्तीवरील पोलिसांनी पाठविली.

Web Title: City police changed the round pattern; There are forty teams on field over day n night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.