विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 07:43 PM2018-03-22T19:43:20+5:302018-03-22T19:45:11+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने जाहीर केलल्या मुदतपूर्व परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे.

Changes in the schedule of postgraduate examinations of the University | विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यापीठ प्रशासनाने २०१७-१८ च्या पदव्युत्तर प्रवेश सीईटीद्वारे देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यात झालेल्या गोंधळामुळे पदव्युत्तरचे प्रवेश तब्बल दोन महिने उशीराने झाले.२६ मार्चपासून सुरु होणार्‍या पदव्युत्तरच्या परीक्षा आता ७ एप्रिलपासून सुरु होणार

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यापरीक्षा विभागाने जाहीर केलल्या मुदतपूर्व परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे. २६ मार्चपासून सुरु होणार्‍या पदव्युत्तरच्या परीक्षा आता ७ एप्रिलपासून सुरु होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली.

विद्यापीठ प्रशासनाने २०१७-१८ च्या पदव्युत्तर प्रवेश सीईटीद्वारे देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यात झालेल्या गोंधळामुळे पदव्युत्तरचे प्रवेश तब्बल दोन महिने उशीराने झाले. याचा परिणाम पहिल्या सत्राच्या परीक्षांवर झाला. तिसर्‍या सत्राच्या परीक्षा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच घेण्यात आल्या. तर प्रथम सत्राच्या परीक्षा डिसेंबरअखेर घेण्यात आल्या. यामुळे दुसर्‍या सत्राच्या अभ्यासक्रमाला नविन वर्षातच सुरुवातच झाली. यामुळे पदव्युत्तरच्या दुसर्‍या सत्राच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटी होण्याची शक्यता होती. मात्र परीक्षा विभागाने २६ मार्चपासूनच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. याविरोधात समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू, प्रकुलगुरू आणि परीक्षा संचालकांना निवेदन देत परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. यावर ‘लोकमत’मध्ये १८ मार्च रोजी प्रकाश टाकण्यात आला होता. यानंतर विद्यार्थी संघटनांनी आग्रही मागणी केल्यामुळे परीक्षा विभागाने वेळापत्रकामध्ये बदल केला आहे. नवीन वेळापत्रकानुसार २६ मार्चपासून सुरु होणार्‍या परीक्षा ७ एप्रिलपासून होणार असल्याची माहिती संचालक डॉ. नेटके यांनी दिली. 

पदवी परीक्षेत ३४० एमपी केस
पदवी परीक्षेत १९ ते २१ मार्च या तीन दिवसात चार जिल्ह्यामध्ये तब्बल ३४० कॉपी करत असलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई (एमपी) करण्यात आली आहे. यावर्षीपासून परीक्षा विभागाने उपस्थित विद्यार्थ्यांची माहिती सूद्धा आॅनलाईन मागविण्यात आली. यात तीन्ही दिवसात १४ हजार १३१ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली असल्याची माहितीही डॉ. नेटके यांनी दिली.

अधिसभेत परीक्षा विभागाचा ठराव
दोन दिवसांपूर्वी झालेल्या विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीत परीक्षा विभागाने प्रत्येक वर्षी पदवी परीक्षांमध्ये उडणारे गोंधळ पूर्णपणे थांबवले आहेत. तसेच कॉपीमुक्त परीक्षेसाठी अभियान राबविण्यात येत असून, परीक्षा हॉलमध्ये मोबाईल घेऊन जाण्यास पूर्णपणे बंदी घातली. यामुळे परीक्षा विभागाच्या अभिनंदनाचा ठराव डॉ. बाबासाहेब कोकाटे यांनी मांडला. तो बहुमताने मंजूर झाला आहे. 

Web Title: Changes in the schedule of postgraduate examinations of the University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.