लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील कृउबामध्ये खरेदी विक्री संघाच्यामाध्यमातून नाफेडने सोयाबीनची हमी भावाने खरेदी सुरु केली आहे. या खरेदी केंद्रावर केवळ शेती मालाची नोंदणी केलेल्याच शेतकºयांचे सोयाबीन खरेदी केले जात आहे. मात्र अजून उडिद आणि मुगाचेच पैसे हातात न पडल्याने शेतकरी अडचणीचा पाढा वाचत आहेत.
येथील कृउबा समितीच्या आवारात ७ नोव्हेंबर पासून ३ हजार ५० रुपये या हमी भावाने सोयाबीनची खरेदी सुरु केली आहे. यासाठी १३०० शेतकºयांनी नोंदणी केली असून, अद्यापपर्यंत ८२ सभासदांचे १ हजार ३२ क्विंटल सोयाबीन खरेदी केले आहे. यामध्ये ७ नोव्हेंबर रोजी १५४ क्वि, ८ नोव्हेंबर रोजी २२३ क्वि, ९ नोव्हेंबरला ७३२ क्विंटल आणि १० नोव्हेंबरला ५२३ क्विंटल असे एकूण १० हजार ३२ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. सोयाबीन विक्री करण्यासाठी जवळपास १३०० शेतकºयांनी नोंदणी केली असून, त्यांना खरेदी विक्री संघाच्यावतीने एसएमएस पाठवून संपर्कही साधण्याचे काम सुरु आहे. दिवसात ४० ते ४५ शेतकºयांना संदेश पाठवून बोलावले जाते. त्यामुळे सोयाबीन घेऊन आलेल्या शेतकºयांची विक्री त्याच दिवशी होते व शेतकरी तत्काळ मोकळे होतात. ५ हजार ५७५ रुपये प्रति क्विंटल प्रमाणे ४०० क्विंटल मूग तर ५ हजार ४०० प्रमाणे ६०० क्विंटल उडिद खरेदी केला आहे. उडिद, मूगाची विक्री करणाºया शेतकºयांसह सोयाबीनची विक्री करणारेही शेतकरी चिंतातूर असल्याचे चित्र दिसत आहे. शेती मालाचे पैसे देण्याची मागणी होत आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.