दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 09:39 PM2019-05-26T21:39:49+5:302019-05-26T21:40:21+5:30

औरंगाबाद-नगर महामार्गावर रविवारी (दि.२६) दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला आहे.

Both die in two different accidents | दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

googlenewsNext

वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावर रविवारी (दि.२६) दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या अपघातात दुचाकी घसरुन अनसूया मिसाळ यांचा मृत्यू झाला असून, दुसºया घटनेत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार पंडीत भारस्कर हा ठार झाला आहे.


वाळूजच्या साठेनगरातील सोपान मिसाळे हे शनिवारी पत्नी अनसूया व नातू संतोष यांच्यासह दुचाकीने कायगाव येथे नातेवाईकाकडे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. ते रविवारी कायगावहून वाळूजकडे येत असताना शिवराई पथकर नाक्याजवळ सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दुचाकी (एम.एच.२०, एफ.११३०) घसरली. यात सोपान मिसाळ, अनसूया व संतोष हे जखमी झाले. इतर वाहनधारकांनी जखमी तिघांना १०८ रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी सुमारास तपासून अनुसया मिसाळ यांनी सकाळी ८.३० वाजेच्या मृत घोषित केले. सोपान मिसाळ यांच्यावर उपचार सुरु आहेत. संतोष (७) किरकोळ जखमी झाला आहे. जागरणा झाल्याने डुलकी लागल्यामुळे दुचाकी घसरुन अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


दुसºया घटनेत पंडित लक्षमणराव भास्कर (५४ रा.फतियाबाद ता.गंगापूर) हे दुचाकीने (एम.एच.२०, सी.जी.८६१५) कायगाव येथून नातेवाईकांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम आटोपून फतीयबादकडे निघाले होते. शिवराईकडे फाट्याजवळ दुपारी १.३०वाजेच्या सुमारास पाठीमागून येणाºया अज्ञात वाहनाने पंडित यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले.

त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पंडित भास्कर हे फतियाबाद ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई म्हणून काम करीत होते. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Both die in two different accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.